शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्याला घेऊन आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या महिलांनी सत्तार तसेच उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांना नटी म्हणणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसे निवेदनही या महिला नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. या भेटीनंतर आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे आलो आहोत, असे उद्धव ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गट-भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

हेही वाचा >> मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक!

bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

“आम्ही एका गंभीर विषयाला घेऊन आज (९ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला आलो होतो. महाराष्ट्रात काही मंत्री महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोललेले आहेत. कोणी एखाद्याला नटी म्हणत आहेत. तर कोणी त्यापेक्षाही गलिच्छ शब्द वापरत आहे. बरं हो एकदा नाही तर वारंवार होत आहे. रविंद्र चव्हाण हे तिसरे मंत्री आहेत. कल्याण-डोंबिवली येथील भाजपाचे एक संदीप माळी नावाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांना अटक केले जात नाहीये. त्यांच्याविरोधातील कलमं कमी कसे करता येतील, यासाठी स्वत: रविंद्र चव्हाण पोलीस ठाण्यात जाऊन बसत आहेत,” असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला आहे.

हेही वाचा >> ५० खोक्यांच्या आरोपावरून शिंदे गटातील विजय शिवतारेंची टीका; म्हणाले “बायकोलाही शंका…”

“हे बेकायदा सरकार आहे. या सरकारमध्ये १८ मंत्री आहेत. मात्र या मंत्र्यांमध्ये एकही महिला नाही. सत्ताधाऱ्यांचा महिलांबद्दल असलेला आकस यातून दिसत आहे. सत्ताधाऱ्यांना महिलांची मतं हवी आहेत, मात्र महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. महिलांना महत्त्व न देणं ही त्यांची संस्कृती आहे. हे मंत्री दिलगिरीही व्यक्त करत नाहीयेत. कोणतेही स्पष्टीकरण देत नाहीयेत. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून काहीही अपेक्षा नाहीये. स्त्रियांचा अपमान करणे हे त्यांचे हिंदुत्व आहे का?” असा सवाल कायंदे यांनी केला.

“सुप्रिया सुळे या सामान्य स्त्री नाहीयेत. त्यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अशा महिलेबद्दल घाणेरडा शब्द वापरण्यात आला आहे. याच कारणामुळे संबंध महाराष्ट्रात महिला संतापलेल्या आहेत. आम्ही यांना सळो की पळो करून सोडू. आम्ही त्यांना समज देऊ असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणत आहेत. मात्र हे मंत्री वारंवार तोच गुन्हा करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता,” अशी अपेक्षा कायंदे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! टेस्ला कंपनीचे ३.९५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाहीत. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन आलो होतो. एका महिलेच्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. मग आज हे सरकार मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घेणार का? आम्ही सगळ्यांकडून आशा सोडलेली आहे. याच कारणामुळे आम्ही राज्यपालांना भेटायला आलो होतो,” असे मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले.