मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. तसंच सरकारने टिकणारं आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ सरकारने मागितला आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. गिरीश महाजन यांनीही आम्हाला हेच आश्वासन दिलं की टिकणारं आरक्षण देणार आहोत. सरकारने मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आम्ही वेळ दिला आहे आता टिकणारं आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलं होतं बेमुदत उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. त्यानंतर बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटी झाल्यावर उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र जालना
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarage patil said we gave time of 40 days to maharashtra government now we need reservation scj