मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्स्वात मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. पण त्यामधून त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आता परत एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यासाठी खुद्द जरांगे पाटलांनी मराठ्यांना आवाहन केलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायगड येथे दसरा मेळावा पार पडणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. जालना या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं आहे.
ज्ञानेश कुमार यांना पदावरून काढून टाकलं पाहिजे-मनोज जरांगे
भाजपा सरकारने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना काढून दुसऱ्याला तिथे नियुक्त करावे असी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे का? असा संशय बळावतो आहे. सरकारने ज्ञानेश कुमार यांना पदावरून काढून टाकलं पाहिजे. यांची गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाही, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारवर टीका केली आहे.
आता संयमाचा बांद तुटणारच आहे-मनोज जरांगे
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत देऊन त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. जर जनता तुम्हाला सत्तेवर बसवू शकते, तर तुम्हाला खाली पण खेचू शकते असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. मराठ्यांचे लोक आरक्षण मागायला लागले तर दादागिरी करायची आणि ते मोडून काढायचे असा खेळ सुरु असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. आता संयमाचा बांध तुटणारच आहे. मला प्रचंड त्रास देणे सुरू आहे. मराठा आंदोलकांना त्रास देणे सुरू आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरकार प्रचंड अन्यायकारी आहे-मनोज जरांगे
मनोज जरांगेंनी जालन्यात बोलत असताना सरकारवर कठोर शब्दांत घणाघात केला आहे. घोषित हुकूमशाही सुरू आहे, आता सत्ताधाऱ्यांची जुलमी राजवट सुरू आहे, हे सरकार प्रचंड अन्यायकारी आहे. असंही जरांगेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कशी काय होत नाही, या प्रश्नावरुन त्यी सरकारला घेरलं आहे. सरकारने गावागावात चारा छावण्या सुरू कराव्यात. मी सरकारचा मित्र व्हायला तयार नाही. मला सरकारपुढे झुकवण्यासाठी ज्या-ज्यावेळी डाव टाकले जातील, त्या-त्यावेळी मराठा समाज १०० पट ताकदीने एकत्र आला पाहिजे, असंही यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी दसरा मेळाव्याबद्दलची भूमिकाही जाहीर केली आहे. नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यावं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आवाहन केलं आहे. नियोजित मेळावा पार पडणार असून त्यांनी मराठा बांधवांना मोठ्या संख्येने एकत्र येण्याचं आवहान केलं आहे.
