scorecardresearch

Premium

ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक भडकावलं जातंय? मनोज जरांगे म्हणाले, “स्थानिक पातळीवर…”

राज्यात एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Manoj jarange patil
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र दिलं जावं, तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. परंतु, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत ओबीसी नेते रवींद्र टोंगे उपोषणाला बसले.

टोंगे यांच्यासह त्यांचे दोन सहकारी उपोषणाला बसले होते. १९ दिवस उपोषण केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. तरीसुद्धा ठिकठिकाणी ओबीसी समाजाची आंदोलनं सुरू आहेत. राज्य सरकार राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण करतंय असा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच आंदोलनासाठी ओबीसी समाजातील लोकांना भडकावलं जात असल्याचा आरोपही होत आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.

Chhagan Bhujbal 5
“…नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल”, मराठा आरक्षणावरील टीकेवरून भुजबळांचा इशारा
Manoj Jarang
“…म्हणून मी दोन पावलं मागे जातोय”, मनोज जरांगे यांचं वक्तव्य; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली
SHinde Fadnavis Govt
“महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
Devendra Fadnavis reaction on obc reservation
मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींचं आरक्षण कमी होणार? फडणवीस म्हणाले, “दोन समाज…”

हे ही वाचा >> “त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ओबीसी बांधवांनी शांततेत त्यांचं आंदोलन केलंच पाहिजे. आमचा त्या आंदोलनाला बिलकूल विरोध नाही. स्थानिक पातळीवर ओबीसी हे आमचे बांधवच आहेत. आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आंदोलनाविषयी आमचं काही मत नाही. फक्त इतरांनी त्यांना भडकावू नये, एवढीच आमची इच्छा आहे. मराठे आणि ओबीसी एकत्र आहेत आणि पुढेही एकत्रच राहतील. ओबीसी बांधवांनी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं पाहिजे. आमच्या हक्कांसाठी आम्ही करतोय. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्ही आरक्षण मागणार आणि घेणार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil answer on is obc reservation protest deliberately fomented asc

First published on: 02-10-2023 at 21:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×