scorecardresearch

“सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?” मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरागे पाटील राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. परंतु, आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.

Manoj Jarange eknath shinde
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली काही वेळापूर्वी पार पडली.

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे सध्या राज्यभर आरक्षणासाठी जनजागृती करत आहेत. जरांगे मंगळवारी (२१ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दाखल झाले. ठाण्यात त्यांची भव्य रॅली पार पडली. या रॅलीदरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून चालू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून आंदोलन बदनाम करू पाहणाऱ्यांवर टीका केली. तसेच अशा लोकांना सरकारचं पाठबळ आहे का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आम्हाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण हवं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडतोय. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असं वाटतंय. आम्ही शांततेचं आव्हान करतोय. हे चुकीचं आहे का?

Nitin Bangude Patil criticized the BJP government
‘होऊ द्या चर्चा’…” भाजप सरकार स्वतःची टिमकी वाजविण्यातच पुढे,” ठाकरे गटाचे नेते बरसले; म्हणाले…
devendra fadnavis obc protest withdraw
ओबीसी आंदोलन मागे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण…”
manoj jarange meet sambhaji bhide
Maratha reservation: जरांगेंची ताठर भूमिका; उपोषण सोडण्यासाठी पाच अटी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा आग्रह
Jitendra Awhad On obc reservation
“मागासवर्गीय जागे व्हा!”, राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे जितेंद्र आव्हाडांचं आवाहन; म्हणाले, “आरक्षण समाप्ती…”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, रात्र-दिवस हे प्रशासन अलर्ट असतं. मोर्चे, यात्रा, रॅली, सभा हे सगळं दिवसरात्र चालू असतं. क्रिकेटही रात्रीचं चालू असतं. त्यामुळे आम्हीदेखील रात्र-दिवस लोकांकडे जातोय. आम्ही शांततेची बाजू मांडतोय. आम्ही सरकारची बाजू मांडतोय. राज्यात शांतता नांदावी असा प्रयत्न करतोय. परंतु, काहींना वाटतंय की राज्यात दंगली व्हायला हव्यात. परंतु, आमची शांततेची भूमिका असूनही आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.

हे ही वाचा >> “फडणवीसांनी भाषणाची स्क्रिप्ट दिली”, रोहित पवारांच्या आरोपावर भुजबळांचं उत्तर; म्हणाले, “पूर्वी शरद पवार…”

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरागे पाटील राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आम्हीदेखील शांततेसाठीच प्रयत्न करत आहोत, तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. तुम्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना खतपाणी घालताय का? राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय, जो समाजांमध्ये तेढ निर्माण करतोय त्याला या सरकारचं पाठबळ तर नाही ना? राज्य सरकारला राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil asks does shinde fadnavis government support rioters asc

First published on: 21-11-2023 at 13:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×