scorecardresearch

Premium

“…तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच”, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

What Manoj Jarange Patil Said?
मनोज जरांगे पाटील (संग्रहित छायाचित्र)

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत होते. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

४० दिवसांत मराठा आरक्षण मिळालं नाही, तर आम्ही कशी फजिती करतो, हेच पाहा, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “एकदा शब्द दिल्यावर आम्ही मराठे मागे हाटत नाही. पण आम्हाला ४० दिवसांनी आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं? तुमच्या समितीनं काय करायचं? या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार.”

maratha reservation obc reservation govt trouble
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून टोलवाटोलवी; मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत
manoj jarange maratha reservation
“विनाकारण इथे येऊन वेगळं बोलायचं अन्…”, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Devendra Fadnavis reaction on obc reservation
मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींचं आरक्षण कमी होणार? फडणवीस म्हणाले, “दोन समाज…”
maratha reservation and eknath shinde
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक; कोंडी फोडण्याचा सरकारचा प्रयत्न

हेही वाचा- “मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी संभाजी भिडेंना…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप

“हे आंदोलन सर्वसामान्य लोकांनी उभं केलं आहे. तुम्ही आतापर्यंत सगळे डाव टाकले आहेत. आता डाव टाकण्याची वेळ आमची आहे. आमचा डाव पडला तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच,” अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

हेही वाचा- ओबीसी आरक्षणातले वाटेकरी कसे वाढले? छगन भुजबळांनी सांगितली आकडेवारी

सरकारला उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तुम्ही आधी सांगितलं की आमचं आंदोलन विरोधीपक्षाने उभं केलंय. नंतर तुम्हाला काहीच सापडलं नाही. आता वेगळंच सांगितलं जातंय की, हे आंदोलन सत्ताधाऱ्यांनीच उभं केलंय. पण असं कधी होऊ शकतं का? त्यांचे सगळे डाव आता सर्वसामान्य लोकांनी ओळखले आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil ultimatum to govt maratha reservation protest in jalna rmm

First published on: 21-09-2023 at 21:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×