“आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले,” राणेंचा उल्लेख करत चित्रा वाघ मु्ख्यमंत्र्यांवर संतापल्या

सर्वज्ञानी असलेल्या संजय राऊत यांनी सवयीप्रमाणे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत अशी टीका चित्रा वाघ केली

Many people lost their lives due to inaction of Thackeray government Criticism of Chitra Wagh
प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खूप जणांचे प्राण वाचू शकले असते असे चित्रा वाघ यांनी म्हटले

सर्वज्ञानी असलेले शिवसेना नेते संजय राऊत आपल्या सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. नेत्यांनी पूरस्थिती असलेल्या भागात पर्यटन टाळावे असे विधान संजय राऊत यांनी केले असता यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खूप जणांचे प्राण वाचू शकले असते असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

“भाजपचे नेते प्रवीण दरेकर व वृत्तवाहिन्या त्या ठिकाणी आधी पोहचल्या, तेथील नागरिकांनीच ३९ मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर १६ तासाने प्रशासन अवतरले. ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात व सरकार पंगु होते. ठाकरे सरकारच्या गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमधे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. संजय राऊत यांनी यानंतर सुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ असा प्रकार आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“नारायण राणे केंद्रातर्फे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत असताना अशावेळी अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते? पुरग्रस्त कोकणच्या जनतेला हे अपेक्षितच होते अशावेळेस तरी आपण आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले. बाकी फौजफाटा व दर्शनसोहळा कुणी केला? याचे उत्तर येणाऱ्या दिवसात आपल्या कर्तुत्वामुळे कोकणच्या जनतेला मिळणारच आहे,” असेही वाघ म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Many people lost their lives due to inaction of thackeray government criticism of chitra wagh abn

ताज्या बातम्या