गडचिरोलीत नक्षल्यांकडून वन विभागाच्या कार्यालयाची जाळपोळ

एका ग्राम पंचायत कार्यालयाचीही नक्षल्यांनी जाळपोळ केली

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील वन विभागाचे कार्यालय बुधवारी रात्री नक्षल्यांनी जाळले. त्याचबरोबर धानोरा तालुक्यातील एका ग्राम पंचायत कार्यालयाचीही नक्षल्यांनी जाळपोळ केली.
अहेरी तालुक्याच्या ठिकाणापासून ४० किलोमीटरवर पेरमिली येथे वन विभागाचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास या कार्यालयाची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या भागामध्ये आतापर्यंत वन विभागाची चार कार्यालये जाळण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांनी या माध्यमातून वन विभागाला लक्ष्य करण्याचे ठरविल्याचे दिसते आहे.
दुसरीकडे धानोरा तालुक्यातील पेढरी पोलीस मदत क्षेत्रातील दुर्गापूर येथील ग्राम पंचायत कार्यालयाची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maoist burn forest office in gadchiroli district