scorecardresearch

प्रिया बेर्डेंच्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ; ७ जुलैला होणार पक्षप्रवेश

सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार प्रिया बेर्डे यांचा पक्षप्रवेश

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ७ जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे पक्षप्रवेश करणार आहेत. प्रसार माध्यमांशी  बोलत असतांना त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. या वृत्ताला प्रिया बेर्डे यांनी दुजोरा दिला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काही तरी करता यावं, यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, त्यामुळे मी येत्या ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करणार आहे. तुमचा आशीर्वादाची गरज आहे”, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या. प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त होणार असल्याचं म्हटलं जातं. आहे. सध्या प्रिया बेर्डे या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे पुण्यामधूनच नवीन काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ७ जुलै रोजी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress priya berde will join ncp on 7th july ssj

ताज्या बातम्या