ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या.

शुभांगी जोशी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का अर्थात शुभांगी जोशी यांचं आज पहाटे निधन झालं. शुभांगी जोशी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यामुळे आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांना न्याय देणाऱ्या शुभांगी जोशी यांनी अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. ‘आभाळमाया’ असो किंवा ‘काहे दिया परदेस’. प्रत्येक मालिकेमध्ये त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

दरम्यान, सध्या कलर्स वाहिनीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actress shubhangi joshi passed away