Maharashtra mlc election result 2023, Maharashtra updates : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे.

याशिवाय औरंगाबाद येथील जागाही अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडेच गेली आहे. तर अमरावतीमध्येही लांबलेला निकाल अखेर महाविकास आघाडीच्याच बाजून लागला. या ठिकाणी धीरज लिंगाडे विजयी झाले त्यांनी भाजपाच्या रणजित पाटील यांचा पराभव केला. नाशिकमधील विजयानतंर आता सत्यजित तांबे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

eastern vidarbh lok sabha marathi news, eastern vidarbh voting 19th april marathi news
पूर्व विदर्भाचा कौल कुणाला? महायुती वर्चस्व राखणार, की आघाडीला ‘अच्छे दिन’ येणार?
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
buldhana lok sabha seat fight going to eknath shinde vs uddhav thackeray
‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ लढत ! खुद्दार विरुद्ध गद्दार असे स्वरूप देण्याचे ठाकरेंचे डावपेच
Chandrapur, Sudhir Mungantiwar, Case Registered, Former Corporator, Woman, Social Media Posts, defamation, code of conduct, election commisson, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

यासह राज्यभरातील विविध महत्त्वपूर्ण घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचा केवळ एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra News Updates: राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षिणक आदी विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एकाच क्लिकरवर.

18:51 (IST) 3 Feb 2023
ठरलं! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी कायम, शनिवारी जागावाटप जाहीर होणार

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लक्ष दिले आहे. वाचा सविस्तर

18:50 (IST) 3 Feb 2023
ठरलं! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी कायम, शनिवारी जागावाटप जाहीर होणार

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लक्ष दिले आहे. वाचा सविस्तर

18:49 (IST) 3 Feb 2023
ठरलं! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी कायम, शनिवारी जागावाटप जाहीर होणार

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लक्ष दिले आहे. वाचा सविस्तर

18:35 (IST) 3 Feb 2023
सांगली : राज ठाकरेंचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात नामंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. यावेळी दगडफेकही झाली.

सविस्तर वाचा

18:25 (IST) 3 Feb 2023
“…तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखू शकतो” सुषमा अंधारेंचं पुण्यात सूचक विधान

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ट्विट केलं. त्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत पुण्यात एका कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या.

सविस्तर वाचा

18:03 (IST) 3 Feb 2023
सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे विधान, म्हणाले...

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटावर मात केली आहे. वाचा सविस्तर

18:02 (IST) 3 Feb 2023
सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे विधान, म्हणाले...

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटावर मात केली आहे. वाचा सविस्तर

18:01 (IST) 3 Feb 2023
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “भल्या सकाळी…”

एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. वाचा सविस्तर

18:00 (IST) 3 Feb 2023
शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

शिवसेनेतील बंडखोरीची त्यावेळी अनेकांना चाहूल लागली होती, असे म्हटले जाते. याबाबत महाविकास आघाडीच्या अनेत नेत्यांनी भाष्यदेखील केले आहे. वाचा सविस्तर

17:59 (IST) 3 Feb 2023
शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

शिवसेनेतील बंडखोरीची त्यावेळी अनेकांना चाहूल लागली होती, असे म्हटले जाते. याबाबत महाविकास आघाडीच्या अनेत नेत्यांनी भाष्यदेखील केले आहे. वाचा सविस्तर

17:58 (IST) 3 Feb 2023
"...ती खंत आजही माझ्या मनात," मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत अजित पवारांनी व्यक्त केली भावना

अजित पवार यांची रोखठोक भाष्य करणारे नेते म्हणून ओळख आहे. पहाटे सहा वाजल्यापासून ते कामाला लागतात. पुण्यात राष्ट्रवादी तसेच अजित पवार यांचे खास वर्चस्व आहे, असे म्हटले जाते. वाचा सविस्तर

17:49 (IST) 3 Feb 2023
राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख अमित ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सौरभ शेट्टी यांनी कुपवाडमध्ये मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र हजेरी लावली. राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र आल्याने चर्चा तर राजकीय वर्तुळात सुरू झाली.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 3 Feb 2023
MLC Election : निवडणुकीतील पराभवानंतर आमदार संजय गायकवाड यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “भाजपने विश्वासातच घेतले असते तर…”

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला. तसे झाले असते तर पदवीधरचा निकाल वेगळाच लागला असता, असा दावाही त्यांनी बोलून दाखवला.

सविस्तर वाचा

17:25 (IST) 3 Feb 2023
पहिल्याच लढतीत लिंगाडे ठरले ‘जायंट किलर’!, रणजीत पाटलांची ‘हॅट्रिक’ हुकवली अन् मंत्रिपदाची संधीही…

आजवरच्या ‘संयमी’ राजकीय कारकिर्दीत केवळ नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या धीरज लिंगाडे यांनी आजच्या विजयाने राजकीय चमत्कार घडवला. ‘हॅटट्रिक’च्या उंबरठ्यावर असलेल्या रणजीत पाटील यांचे मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त केले असून संभाव्य मंत्रिपदाची संधी देखील हुकली असल्याचे मानले जात आहे.

सविस्तर वाचा

15:49 (IST) 3 Feb 2023
MLC Election : तब्बल तीस तासांची प्रतीक्षा अन् धीरज लिंगाडेंच्या विजयाचा जल्लोष! बुलढाण्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी

तब्बल तीस तासांच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘निकाल’ लागला अन् धीरज लिंगाडे विजयी झाल्याच्या घोषणेनंतर त्यांच्या कर्मभूमी असलेल्या बुलढाणा शहरासह जिल्ह्यात विजयाचा एकच जल्लोष साजरा झाला. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आल्याचा भास फटाक्यांच्या सार्वत्रिक आतीषबाजीने झाला!

सविस्तर वाचा

15:09 (IST) 3 Feb 2023
“शेवटी विजय नेहमी मतदारांचाच होत असतो, त्यापुढे संपत्ती…” धीरज लिंगाडेंचं विधान

विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...

14:52 (IST) 3 Feb 2023
अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपाला धक्‍का

विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. धीरज लिंगाडे यांनी त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 3 Feb 2023
“अजित पवारांवर अनेक वेळा अन्याय पण त्यांना तो…” चंद्रकांत पाटलांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून तुमच्या कामावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आताचे पालकमंत्री खूप वेळ देतात. सहजपणे लोकांना उपलब्ध होतात. ते सर्वांचं ऐकून घेतात.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 3 Feb 2023
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दुसऱ्यांदा उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा

14:18 (IST) 3 Feb 2023
डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रुळ ओलांडून जीवघेणा प्रवास

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते तीन स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणारे अनेक प्रवासी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारुन लोखंडी अडथळे ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत.

सविस्तर वाचा

14:14 (IST) 3 Feb 2023
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संमेलनाध्यक्षांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी, विदर्भ वाद्यांचा गनिमी कावा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा येथे आयोजित ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुमारे ५० वर कार्यकर्ते सर्वसाधारण श्रोते म्हणून संमेलनाच्या मंडपात पोहोचले.

सविस्तर वाचा

13:56 (IST) 3 Feb 2023
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अंतिम आकडेवारी

उमेदवार अनिल अमलकर बाद

(२१ उमेदवार बाद)

अंतिम

मतसंख्या

धीरज लिंगाडे - ४६ हजार ३४४

डॉ. रणजीत पाटील - ४२ हजार ९६२

सदर आकडेवारी अंतिम असून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाला पाठवली. त्यानंतर निकाल जाहीर होईल.

13:39 (IST) 3 Feb 2023
“घर फोडल्यामुळे भाजपाचा पराभव” म्हणणाऱ्या पटोलेंना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही उद्धव ठाकरेंना…”

घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 3 Feb 2023
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, "आज..."

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 3 Feb 2023
नाशिक: परीक्षा कामकाजावर बहिष्कार, नंतर बेमुदत काम बंद; महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 3 Feb 2023
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू

उमेदवार अरूण सरनाईक बाद

(१९ उमेदवार बाद)

मतसंख्या

धीरज लिंगाडे - ४४ हजार ४४८

डॉ. रणजीत पाटील - ४१ हजार ८९६

अजूनही कोटा (४७ हजार १०१ मते ) पूर्ण नसल्याने सद्य:स्थितीत सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची (डॉ. प्रवीण चौधरी, १ हजार ७७४ मते ) दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरू

12:43 (IST) 3 Feb 2023
चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे लढण्याची शक्यता?, राहुल कलाटे यांचे पुन्हा जगतापांना आव्हान!

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अधिकच रंगदार स्थितीत पोहचणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणला असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राहुल कलाटे यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

12:36 (IST) 3 Feb 2023
वाहन कोंडी टाळण्यासाठी पेंढरकर काॅलेज ते घरडा सर्कल वाहतुकीचे नियोजन

डोंबिवली शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल चौक दरम्यान दररोज होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन वाहतूक विभागाने या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना सम विषम तारखांना वाहने उभी करण्याचे नियोजन केले आहे.

सविस्तर वाचा

12:30 (IST) 3 Feb 2023
अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत नाट्यमय घडामोडी घडत असताना जगताप कुटुंबातील दोन्ही समर्थकाकांकडून इमेज वॉर पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्यानंतर दोन्ही समर्थकांनी आपापल्या इच्छुक उमेदवाराचे फोटो व्हायरल करून प्रचार करत आहेत.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 3 Feb 2023
अ.भा. मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांचे आगमन आनंददायी, गडकरींची अनुपस्थिती

बरोबर ४० मिनिटे उशिरा आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन आनंददायी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती आयोजकांवर नाराजीची लकेर उमटवणारी ठरली.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 3 Feb 2023
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी, आजोबा दिवस; शासनाचे परिपत्रक जारी

शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी, आजोबांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी, आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी, आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 3 Feb 2023
कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला गती; रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अंतिम मंजुरी

बहुप्रतिक्षित कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच या कामासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 3 Feb 2023
पुणे: मनसेचे माजी माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश माझिरे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 3 Feb 2023
पुणे: राज्यसेवेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींचे पुण्यात आंदोलन सुरू

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली.

सविस्तर वाचा

12:08 (IST) 3 Feb 2023
नागपूर : ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन नर्सिंग महाविद्यालय!, अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे आशा पल्लवित

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारच्या (१ फेब्रुवारी २०२३) अर्थसंकल्पात २०१४ पासून स्थापन १५७ वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहस्थानांवर नवीन नर्सिंग महाविद्यालयांची घोषणा केली.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 3 Feb 2023
माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर

कल्याण जवळील मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त मोठा जत्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम होतात. या उत्सवांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी सकाळी साडे आठ वाजता मलंगगडावर येऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आरती, दर्शन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 3 Feb 2023
MLC Election 2023: अमरावती पदवीधर मतदार संघात ‘त्‍या’ अवैध मतांचे गूढ काय?

मतमोजणी केंद्राबाहेर काल सकाळपासूनच डॉ. रणजित पाटील आणि धीरज लिंगाडे यांच्‍या समर्थकांची गर्दी होती. सायंकाळपर्यंत धीरज लिंगाडे हे सुमारे दोन हजार मतांची आघाडी टिकवून असल्‍याने भाजपा कार्यकर्त्‍यांची गर्दी कमी झाली.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 3 Feb 2023
MLC Election : अमरावती पदवीधर मतदार संघात बाद फेरीची मतमोजणी सुरूच; निकालास विलंब, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

मतमोजणीच्‍या चोवीस तासांच्‍या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्‍या. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 3 Feb 2023
MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?

अमरावती पदवीधर मतदार संघात एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. नोंदणी झालेल्‍या २ लाख ६ हजार १७२ मतदारांपैकी ४९.७५ टक्‍के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. मतमोजणीची गती संथ होती.

सविस्तर वाचा

11:05 (IST) 3 Feb 2023
“आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं, की…” नागपूरमधील पराभवानंतर फडणवीसांचं मोठं विधान!

नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:03 (IST) 3 Feb 2023
MLC Election : निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत आणि नंतरही राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांना भावना अनावर झाल्याचेही दिसून आले. वाचा सविस्तर बातमी...

10:55 (IST) 3 Feb 2023
विधान परिषदेत भाजपला धक्का; नागपूरची हक्काची जागा गमावली, महाविकास आघाडीचे वर्चस्व

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर बातमी...

10:54 (IST) 3 Feb 2023
MLC Election Result: पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे विजयी, मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव

Nashik Graduate Constituency Election Result: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती. पण पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...

10:53 (IST) 3 Feb 2023
“दिल्लीस मान्य नाही म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या चरणी अर्पण करणे कितपत योग्य?” ठाकरे गटाचा सवाल!

कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. राज्यगीतावेळी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र यावरून शिवसेनेने(ठाकरे गट) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.