Maharashtra News Updates, 21 February 2023 : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याबाबतची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
rashtrasant tukdoji maharaj marathi news, rashtrasant tukdoji maharaj voter appeal
मतदान राजा, तुकडोजी महाराज म्हणतात, नीट विचार करून मत दे…!
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Live Updates

Marathi News Updates : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका; शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल

18:41 (IST) 21 Feb 2023
बुलढाणा: शेतकऱ्यांवरील लाठीमार षडयंत्रच ! मला संपविण्याची सुपारी देण्यात आली; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आत्मदहन आंदोलनात झालेला लाठीमार सुनियोजित षडयंत्रच होते. मला संपविण्याची सुपारी पोलिसांच्या माध्यमाने देण्यात आल्याचा गंभीर आरोप 'स्वाभिमानी' चे नेते रविकांत तुपकर यांनी येथे केला आहे.

सविस्तर वाचा

18:31 (IST) 21 Feb 2023
नागपूर: संजय राऊत यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी 'त्या' एजंटचे नाव सांगावे,बच्चू कडू यांचे आव्हान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

सविस्तर वाचा

18:26 (IST) 21 Feb 2023
संजय राऊतांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ''बिनडोक आरोप...''

संजय राऊतांचे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे, की सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे, हे तपासले पाहिजे. कोणत्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं आहे. खरं तर कोणाच्याही सुरक्षेच्याबाबतीत राज्य सरकार राजकारण करत नाही. त्यांना आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. मात्र, संजय राऊतांना काही दिवसांपासून प्रसिद्धीची सवय लागली आहे. ते विनाकारण आरोप करतात. पूर्वी आम्ही त्यांच्या आरोपाला उत्तर देत होतो. मात्र, आता ते बिनडोक आरोप करतात. त्यांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

18:08 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर परिमंडळात वीज बिलांची थकबाकी ४९३ कोटींच्या घरात

महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मात्र, ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीची अडचण आहे. राज्यात वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर असून चंद्रपूर परिमंडळात ही थकबाकी ४९३ कोटींच्या घरात पोहोचली आहे.

सविस्तर वाचा

18:08 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर: काही सुखद! जबाबदार अधिकारी असले की प्रश्न असे लगेच सुटतात…

एकाच शिक्षकांवर पाच वर्गांचा भार, शिक्षक एकाच वर्गात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांची चक्क शाळा गाठून शाळेला कुलूप ठोकले.

सविस्तर वाचा

17:33 (IST) 21 Feb 2023
बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, निकालावर मात्र संकट! उत्तरपत्रिका मूल्यांकनावर शिक्षकांचा बहिष्कार

राज्यातील शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली. त्याचा विपरीत परिणाम निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.

सविस्तर वाचा....

17:25 (IST) 21 Feb 2023
“शिवसेना संपवल्याचा अमित शहांना आसुरी आनंद” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात म्हणाले, “आमच्या नादी लागाल तर…”

मोदी आणि शहांचे राजकारण हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यातून शिवसेना संपवली यांचा आनंद अमित शहा यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आसुरी आनंद व्यक्त करताना उद्धवचा वध केला आणि आपला अजून एक शत्रू आहे तो म्हणजे वंचित, म्हणून ते आमच्याही मागे लागण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 21 Feb 2023
“मुंबईतील ‘ती’ फ्लेक्सबाजी मनाला लावून घेऊ नका”, अजित पवार यांचे आवाहन

पुणे : “भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. ही फ्लेक्सबाजी अतिउत्साही कार्यकर्त्यांची आहे, पण लोकशाहीत १४५ चा आकडा पार पाडणारा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे त्याला महत्व देऊ नका”, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईतील फ्लेक्सवर स्पष्टीकरण दिले. ते पिंपरीत बोलत होते.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 21 Feb 2023
१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’

भंडारा : आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 21 Feb 2023
मुंबई: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवा ;एस.टी. महामंडळाच्या वाहतूक खात्याच्या विभाग नियंत्रकांना सूचना

फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवावे, तसेच, परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थ्याने बस थांबवण्यासाठी हात दाखवल्यास त्याला बसमध्ये घ्यावे, अशा सूचना एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना केल्या आहेत.

सविस्तर वाचा

16:43 (IST) 21 Feb 2023
भंडारा: पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी पुरविण्याचे प्रकार, इतर विद्यार्थ्यांचे नुकसान

भंडारा जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. मात्र अगदी पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाट कॉपी चालल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे.आज इयत्ता बारावीचा इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर होता.

सविस्तर वाचा

16:39 (IST) 21 Feb 2023
माजी नगरसेवक मनोहर मढवी यांच्या तडीपार आदेशाला स्थगिती

नवी मुंबई : ऐरोली भागात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मनोहर मढवी उर्फ एमके यांच्या तडीपार आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. एमके यांना ऑक्टोबर महिन्यात ठाणे रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. हा निर्णय पोलिसांचा नसून राजकीय असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 21 Feb 2023
देवासमोर नतमस्तक होणाऱ्या वाघासमोर क्रिकेटचा देव नतमस्तक होतो तेव्हा…

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे व्याघ्रप्रेम जगजाहीर आहे आणि या व्याघ्रदर्शनासाठी त्याची पहिली पसंती महाराष्ट्रालाच राहिली आहे. त्यामुळे तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हमखास येतो.

वाचा सविस्तर...

16:27 (IST) 21 Feb 2023
महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात महाविकास आघाडीतर्फे पाचोर्‍यात आंदोलन

पाचोरा तालुक्यातील जळगाव-पाचोरा-कजगावदरम्यान सुमारे नऊ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून, नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगावसह परिसरातील ग्रामस्थांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा

16:18 (IST) 21 Feb 2023
“संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांच्या मेंदूचा केमिकल…”, बच्चू कडूंची ‘त्या’ आरोपांवरून टीका!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये  हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे. अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

सविस्तर वाचा

16:12 (IST) 21 Feb 2023
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच न्यायालयात सुनावणी; पहिल्या दिवशी काय घडलं?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह विविध मुद्द्यांवरू जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आजची सुनावणी पार पडली असून उद्या पुन्हा याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.

16:08 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर : चित्र प्रदर्शनातून काँग्रेसकडून मोदी सरकारची पोलखोल

केंद्रातील मोदी सरकारने आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. देशातील वाढत्या महागाईने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगार युवा वर्ग नैराश्यात आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.

सविस्तर वाचा

16:07 (IST) 21 Feb 2023
जळगाव न्यायालयात हत्येचा बदला घेण्यासाठी गेलेल्या फरार आरोपीला अटक, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

कल्याण – जळगाव न्यायालयात मुलाचा हत्येचा बदला घेण्यासाठी गेलेल्या दोन मारेकऱ्यांपैकी एका फरार मारेकऱ्याला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सुरेश रवी इंदाते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 21 Feb 2023
नागपूर: शेतक-यांच्या जमिनी लिलावात घेणा-यांचे हातपाय तोंडू, काय म्हणाले बच्चू कडू

कर्ज थकल्याने शेतक-यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतक-यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.

सविस्तर वाचा

16:01 (IST) 21 Feb 2023
यवतमाळ : त्याने दगा दिला, तिने विष प्राशन करून गर्भातील बाळासह जीव दिला!

हृदय पिळवटून टाकणारी ही प्रेमकथा वणी तालुक्यातील कळमना या गावात घडली. श्वेता (२१) असे या प्रेमकथेतील मृत तरुणीचे नाव आहे. तर सचिन रमेश नवले (३०) या तरूणाविरूद्ध शिरपूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला श्वेताच्या मृत्यूप्रकरणी अटक केली.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 21 Feb 2023
“श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिले पत्र; म्हणाले, “एक कुख्यात गुंड...”

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. सविस्तर वाचा

15:48 (IST) 21 Feb 2023
बहुमत असलेले आमदार स्वतःला राजकीय पक्ष मानायला लागले आहेत- कपिल सिब्बल

विधिमंडळात बहुमत असलेले आमदार स्वतःला राजकीय पक्ष मानायला लागले आहेत. स्वतःच्या सोयीनुसार आदेश दिले जात आहेत. हा घटनात्मक मुद्दा आहे. मुळात चीफ व्हिप आणि डेप्युटी व्हिप यांची नियुक्ती राजकीय पक्षांद्वारे केली जाते - कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

https://twitter.com/LiveLawIndia/status/1627961865438629890?s=20

15:38 (IST) 21 Feb 2023
भंडारा : इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थिनी वर्गखोलीतच झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज!

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे. त्यातूनच अनेक विद्यार्थी टोकाची भूमिकादेखील घेत आहेत. अशातच, आज इंग्रजी विषयाचा पेपर पाहताच एक विद्यार्थिनी वर्गखोलीतच बेशुद्ध झाली.

सविस्तर वाचा

15:37 (IST) 21 Feb 2023
सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक हैराण

डोंबिवली औद्योगिक विभागात एमआयडीसीकडून काँक्रिट रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. ही रस्ते कामे करताना खोदकाम करताना जेसीबी चालकाकडून कंपन्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फोडण्यात येत असल्याने उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 21 Feb 2023
मुंबईः मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवून ६० जणांची फसवणूक; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून ५० ते ६० जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वाचा

15:17 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर: शेतीच्या मोबदल्यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा राज्य महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

महाराष्ट्र - तेलंगणा राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या महामार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले.

सविस्तर वाचा

15:13 (IST) 21 Feb 2023
परभणीत शिंदे गटाची सल अद्यापही कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अजूनही जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी जागा शोधावी लागत आहे. शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात आपल्याला शिरकाव करता येत नसल्याची सल एकनाथ शिंदे गटाला आहे.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 21 Feb 2023
श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांचा लिहिले पत्र

श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1627960551287701508?s=20

15:05 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर : बिबटं वाघाच्या क्षेत्रात गेला अन् जीवाला मुकला

बिबटं वाघाच्या अधिवास क्षेत्रात आल्याने दोघांत झुंज झाली. यात बिबट्याला जीव गमवावा लागला. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव वनपिरक्षेत्रातील कक्ष क्रमांक २६७ मध्ये घडली. वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

14:36 (IST) 21 Feb 2023
चंद्रपूर: कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीचा महिला सशक्तीकरणासाठी ९,१६५ किमी सायकलने प्रवास; वाचा थक्क करणारी कहाणी

आज समाज प्रगत झाला असला तरी महिला अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा कठीन स्थितीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकुन देत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे.

सविस्तर वाचा

14:27 (IST) 21 Feb 2023
“राज्य सरकार राज्यसेवा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या बाजूने”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन; म्हणाले, “आम्ही ‘एमपीएससी’ला..”

पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे गेल्या २४ तासांपासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 21 Feb 2023
निवडणूक आयोग दबावाखाली काम करते आहे - संजय राऊत

निवडणूक आयोग दबावाखाली काम करते आहे. त्यांनी दिलेल्य निर्णय घटनाबाह्य आहे. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही शिंदे गटाला शिवसेना मानत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

14:09 (IST) 21 Feb 2023
उद्धव ठाकरेंना जनतेचा कौल घ्यावा लागेल - अशोक चव्हाण

उद्धव ठाकरेंना जनतेचा कौल घ्यावा लागेल. त्यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती आहे. त्यांना नवं चिन्ह मिळालं तरी लोक मत ठाकरेंच्या नावाने देणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

14:06 (IST) 21 Feb 2023
“शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; काय म्हणाले बच्चू कडू…

कर्ज थकल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.

सविस्तर वाचा

13:45 (IST) 21 Feb 2023
नागपूर: जनस्थान पुरस्कारासाठी मोजक्याच स्त्रीया पात्र का?; ज्येष्ठ कथाकार आशा बगे यांची प्रश्नवजा खंत

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार मिळवणारी मी तिसरी किंवा चौथी स्त्री असावी. गेल्या १७ वर्षात या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानला मोजक्याच स्त्रिया का पात्र वाटल्या, अशी प्रश्नवजा खंत ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा

13:43 (IST) 21 Feb 2023
लोकसत्ता इंपॅक्ट : वनजमीन विक्रीप्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित; दोषींवर कारवाईत हायगय केल्याचा ठपका

शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या कोट्यवधीच्या वनजमिनीवर लेआऊट तयार करून भूखंड विक्री केल्याच्या प्रकरणात भूमाफियांवर कारवाई करताना हयगय केल्यामुळे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 21 Feb 2023
थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. लंच ब्रेक नंतर थोड्याच वेळात सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल.

12:53 (IST) 21 Feb 2023
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील १० महत्त्वाचे मुद्दे
  • घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.
  • आमदारांची संख्या जास्त असल्याने आम्हीच खरा पक्ष असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले. राज्यापालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
  • अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे देऊ शकते? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे.
  • संविधानाच रक्षण करणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसून येत आहे. हे दुर्देवी आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
  • बहुमत आहे की नाही हे न बघता राज्यापाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.
  • पक्षांतील बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
  • बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी हे सर्व घडत होते. यासंदर्भात कोणतीही पक्षाची बैठक झाली नव्हती – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
  • विधासभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदे गटाच्या वकिलांनीही उत्तर दिलं आहे. शिंदे गटाला वगळल्यानंतर नार्वेकरांना निवडीसाठी आवश्यक ती मतं मिळाली असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू आहे.
  • अध्यक्षांची निवड चुकीची असेल तर त्यांना अधिकार नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
  • असंविधानिक गोष्टी थांबल्या नाहीत, तर भविष्यात अनेक प्रकरण पुढे येतील, असही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
  • 12:37 (IST) 21 Feb 2023
    कपिल सिब्बल यांच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

    विधासभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी आहे, असा युक्तिवाद कपि सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदे गटाच्या वकिलांनीही उत्तर दिलं आहे. शिंदे गटाला वगळल्यानंतर नार्वेकरांना निवडीसाठी आवश्यक ती मतं मिळाली असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू आहे.

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627924861590061057?s=20

    12:17 (IST) 21 Feb 2023
    वर्धा: काँग्रेस अधिवेशनात यायचंय, मग मोजा सतराशे रुपये!

    छत्तीसगड राज्यातील नवे रायपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ८५ वे अधिवेशन होत आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक समिती सदस्यास चक्क सतराशे रुपये मोजावे लागणार आहेत. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या अधिवेशनात प्रदेश सदस्यास एक हजार रुपये वार्षिक शुल्क भरायचे आहे.

    सविस्तर वाचा

    12:08 (IST) 21 Feb 2023
    बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? - कपिल सिब्बल

    बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी हे सर्व घडत होते. यासंदर्भात कोणतीही पक्षाची बैठक झाली नव्हती - कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627918857028665344?s=20

    12:00 (IST) 21 Feb 2023
    पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज - कपिल सिब्बल

    पक्षांतील बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

    11:58 (IST) 21 Feb 2023
    सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    बहुमत आहे की नाही हे न बघता राज्यापाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? - कपिल सिब्बल

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627917126853074944?s=20

    11:47 (IST) 21 Feb 2023
    संविधानाच रक्षण करणं हे राज्यपालांचं कर्तव्य- कपिल सिब्बल

    संविधानाच रक्षण करणं ही राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसून येत आहे. हे दुर्देवी आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627914490401673216?s=20

    11:40 (IST) 21 Feb 2023
    आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा - कपिल सिब्बल

    अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे देऊ शकते? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे.

    11:35 (IST) 21 Feb 2023
    लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले- कपिल सिब्बल

    आमदारांची संख्या जास्त असल्याने आम्हीच खरा पक्ष असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले. राज्यापालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627910456768856064?s=20

    11:30 (IST) 21 Feb 2023
    याला पक्षातील फूट म्हणता येईल का? कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला प्रश्न

    घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

    11:27 (IST) 21 Feb 2023
    पुण्यातील लोहमार्ग जीवघेणा!, वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू; रेल्वेगाडीखाली आत्महत्येच्या घटना वाढल्या

    लोहमार्ग ओलांडणे बेकायदा आहे. लोहमार्ग बेकायदा ओलांडल्यास रेल्वे कायद्यान्वये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या पुणे विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, दौंड, मिरज, साेलापूर, कोल्हापूर, अहमदनगर ही महत्त्वाची स्थानके लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येतात.

    सविस्तर वाचा

    11:24 (IST) 21 Feb 2023
    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.

    https://twitter.com/LiveLawIndia/status/1627909097424314369?s=20

    11:14 (IST) 21 Feb 2023
    Acid Attack: कल्याणमध्ये मोटारमधून प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी जखमी

    Acid Attack कल्याण पूर्वेतील सूचक नाका भागातून पायी चाललेल्या एका पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर एका सफेद रंगाच्या मोटारमधील प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी गंभीररित्या भाजला आहे.

    सविस्तर वाचा

    निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे.