Maharashtra News Updates, 14 September 2026 : संपूर्ण देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबईमधील बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून आज ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे देखील आजच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, यासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडी व महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Ganesh Utsav 2026 Live Updates from Maharashtra : राज्यातील सर्व राजकीय घडामोडी व गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
"मला आश्चर्य वाटतंय, याच सरकारने यापूर्वी हे प्रकरण बंद केले होते. नक्की काय चाललंय, मला समजत नाही. परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी संजय राऊतांशी बोलेन", असे खासदार सुप्रिया सुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी, आदित्य ठाकरेही उपस्थित; बाप्पाचं दर्शन आणि सेलिब्रेशन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्या घरी असलेल्या गणरायचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी परिधान केलेले एकसारखे झब्बे लक्ष वेधून घेत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं आहे. "मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आज सहकुटुंब श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून भक्तीभावाने स्वागत केले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्यावर श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कुटुंबीयांसह भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करत गडकरी यांनी देशातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि संपन्नता लाभो अशी प्रार्थना केली.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या घरी थाटात गणरायाचे आगमन
भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे थाटात आगमन झाले. पाटील कुटुंबीयांनी सहकुटुंब भक्तिभावाने गणरायाची पूजा केली. यावेळी कपिल पाटील यांनी देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाच्या चरणी साकडे घातले.
ध्वनिवर्धकांच्या नव्हे, गरजूंसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श; शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाचा उपक्रम
उद्धव ठाकरेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
मुंबईमधील लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान; ग्रामदैवताच्या दर्शनासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री कसबा गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा मंगल सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, वेदमंत्रांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कसबा गणपती मंदिर परिसर दुमदुमून गेला. सकाळपासूनच ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
नवीन राजवाड्यावर शाही थाटात गणरायाचे आगमन
कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर गणरायाचे शाही थाटात आगमन झाले. भोई समाजाकडून पारंपरिक पद्धतीने पालखीत गणरायाला विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांच्या जयघोषात हा आगमन सोहळा पार पडला. यावेळी खासदार शाहू छत्रपती यांनी गणरायाचे दर्शन घेत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.
पुण्यात २१ हजार पुऱ्यांचा १३ फूटी गणराया अवतरला! फर्ग्युसन रस्त्यावर झाले या अनोख्या गणपतीचे अनावरण
नागपूर कराराला पुन्हा हरताळ; विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दोनच आठवड्यांचे!
राज्याच एक अधिवेशन नागपुरात घेण्याबाबतचा करारच महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी करण्यात आला होता. त्यानुसार हे अधिवेशन सहा आठवड्याचे असायला हवे. पंरतु गेल्या दीड, दोन दशकात अधिवेशन सहा आठवडे तर सोडा चारही आठवडे चालत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. संसदीय कार्य विभागाने कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका निश्चित केली आहे. यानुसार कामकाज फक्त दोनच आठवडे चालणार आहे. त्यामुळे यावर्षीही कराराच भंगच होणार असल्याचे दिसते.
उद्धव ठाकरेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
मुंबईमधील लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह दादर येथील त्यांचे भाऊ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी बाप्पाचा आशीर्वाद घेतला
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह दादर येथील त्यांचे भाऊ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; CBI कडून FIR दाखल
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने सोमवारी एफआयआर दाखल केली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान
अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्यातील डोणजे येथील निवासस्थानी यंदाही लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाना पाटेकर यांनी कुटुंबीयांसोबत भक्तिभावाने गणपती बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना केली. साधेपणा आणि परंपरेला जपणारा नाना पाटेकर यांचा गणेशोत्सव नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
VIDEO : मृत्यूनंतरही सुटका नाही! सालईटोल्यात बांबूला खाट बांधून मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ; ग्रामस्थांची दीड-दोन किलोमीटरची पायपीट
बाप्पा मोरया! पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान, दर्शनासाठी पुणेकरांची मोठी गर्दी
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री कसबा गणपती बाप्पांच्या आगमनाचा मंगल सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. ढोल-ताशांचा गजर, वेदमंत्रांचा निनाद आणि बाप्पांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. बाप्पांना पालखीत विराजमान करून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
“सगळे नाही, एकटाच मुंबईला येतोय”, मनोज जरांगेंची मोठी घोषणा
सध्या मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करत मराठा समाजाला मोठ्या संख्येनी मुंबईला येण्याचं आवाहन आधी केलं होतं. मात्र, आता मनोज जरांगे यांनी आज (१४ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक मोठी घोषणा केली आहे. "सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय, आता सरकार कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो", असं मनोज जरांगे यांनी म्हणत सरकारला मोठा इशारा दिला आहे.
नागपूर: दर दिवसाआड खून, हत्येचा प्रयत्न, गोळीबार; हिंसक घटनांमध्ये ४३ टक्क्यांनी वाढ!
"सगळे नाही, एकटाच मुंबईला येतोय", मनोज जरांगेंची मोठी घोषणा; म्हणाले, "आता कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं आहे. सध्या राज्यभरात लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका - गणेश चतुर्थी एकाच दिवशी; बाप्पांची स्थापना नेमकी कधी? दा. कृ. सोमण यांनी सांगितली ‘ही’ वेळ
पुण्यात अथर्वशीर्ष पठणानिमित्त उद्या वाहतूक बदल
‘बाप्पा डॉट ओआरजी’ चा ‘युनेस्को’शी काय संबंध ? घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्यांचा गौरव होणार !
पुण्यात गणेशोत्सवात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त; गर्दीवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर
वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवाया, उत्सवातील गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक ‘एआय’ कॅमेऱ्यांची गर्दीवर नजर राहणार आहे.
राहुल गांधींनी गणेश चतुर्थीनिमित्त दिल्या सर्वांना शुभेच्छा
"श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा मंगलमय सण तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करो आणि तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो, अशी मी आशा करतो", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या घरीही लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन
पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर ३० हजार महिला करतात अथर्वशीर्ष पठण; ४० वर्षांची अनोखी परंपरा; काय आहे हा सोहळा? जाणून घ्या!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मुंबईमधील बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे देखील आजच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा कशी, किती वाजता करावी? मुहूर्तवेळा जाणून घ्या…, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
