पंढरपूरजवळ शेतात विवाहितेची आत्महत्या

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे एका विवाहितेने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेखा बाळासाहेब लिंगडे (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे एका विवाहितेने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेखा बाळासाहेब लिंगडे (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. काल मंगळवारी रात्री रेखा ही घरातून गायब झाली होती. तिचा शोध घेतला असता बुधवारी, दुस-या दिवशी लिंगडे यांच्याच शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत रेखा आढळून आली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पाण्यात बुडून मृत्यू
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सुजाता पोपट गोरे (३१) हिचा तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. नातेपुते पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Married suicide in field near pandharpur