सोलापुरात करोनाला घाबरून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रेखाराणी अमर मुंडे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सोलापूर : करोना विषाणूला घाबरून मानसिकदृष्टय़ा खचलेल्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील विजापूर रस्त्यावर मंत्री-चांडक रेसिडेन्सीमध्ये रात्री हा प्रकार घडला.

रेखाराणी अमर मुंडे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेखाराणीचे पती अमर मुंडे यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. दरम्यान, त्यांच्या परगावच्या मावस भावाला करोनाची लागण झाल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यास जेवणाचा डबा देण्यासाठी अमर मुंडे हे जात होते. परंतु हा डबा घेऊ न त्यांनी जाऊ  नये म्हणून पत्नी वारंवार बजावून सांगत होत्या. याच कारणावरून दोघांत घरात पुन्हा रात्री वाद झाला.  रेखाराणी करोनाला प्रचंड घाबरली होती. त्यामुळे पती अमर यांनी, तू घाबरू नकोस, असे सांगत त्यांनी समजूत काढली.

या वेळी घरातील खोलीत रेखाराणी हिने गळफास घेऊ न आत्महत्या केली. तिला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मरण पावली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Married woman commits suicide due to corona fear in solapur zws

ताज्या बातम्या