scorecardresearch

Premium

सोलापूर: नणंदेचा मुलगा दत्तक घेण्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या

मूल होण्यासाठी अनिता व पती हणमंत हे कोल्हापूर येथे उपचार घेत होते.

dead , commits suicide due to torturei in solapur
सोलापूर: नणंदेचा मुलगा दत्तक घेण्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या

सोलापूर: नणंदेच्या मुलाला दत्तक घेण्यासाठी सासरी वाढलेला दबाव आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेस गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूसह नणंद आणि नणंदेचा मुलगा अशा तिघांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रूक येथे ही घटना घडली. अनिता हणमंत मोहिते (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासू शांताबाई तुकाराम मोहिते ( वय ५६, रा. सलगर बुद्रुक ), नणंद बाळाबाई मनोहर गंभीरे (वय ३८) आणि तिचा मुलगा अतुल मनोहर गंभीरे ( वय २१, दोघे रा. जवळा, ता. सांगोला ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात मृत अनिता हिचा भाऊ प्रशांत शंकर लवळे (वय २८, रा. मुढवी, ता. मंगळवेढा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत अनिता हिचे लग्न झाल्यानंतर तिला बरीच वर्षे मूलबाळ होत नव्हते. मूल होण्यासाठी अनिता व पती हणमंत हे कोल्हापूर येथे उपचार घेत होते. मात्र सासू शांताबाई हिचा उपचार घेण्यास विरोध होता. त्याऐवजी आपल्या नातवाला दत्तक घ्यावे, असा तिचा आग्रह होता. त्यातून अनिता हिच्यावरील उपचार बंद केले होते. सासू शांताबाईसह नणंद बाळाबाई आणि दत्तक जाण्यासाठी तयार झालेला नणंदेचा मुलगा अतुल या तिघांनी अनिता हिच्यावर सतत दबाव आणला. परंतु तशी तिची मानसिकता नसल्यामुळे संतापलेल्या सासू, नणंद व नणंदेच्या मुलाकडून तिचा सतत शारिरिक व मानसिक छळ होऊ लागला. याबाबत मृत अनिता हिने माहेरी संपर्क साधून होणाऱ्या त्रासाबद्दल गाऱ्हाणे मांडले होते. शेवटी तिने सासू, नणंद व तिच्या मुलाच्या त्रासाला आणि दत्तक घेण्यासाठीच्या दबावाला वैतागून सासरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ncp mla sumantai patil on indefinite hunger strike in front of collector office over water issue
सांगली: टेंभूच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटलांचे उपोषण
eknath shinde and sanjay raut
“संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी…”, शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका
Ganapati Visarjan
गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊसही हजर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार? जाणून घ्या
narendra patil expressed displeasure maharashtra leaders
नवी मुंबई : दांडी मारलेल्या नेत्यांच्या विषयी नाराजी, एक दिड महिन्यांपूर्वी वेळ घेतली होती … माथाडी नेते नरेंद्र पाटील

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Married woman commits suicide due to torture to adopt child in solapur amy

First published on: 23-09-2023 at 20:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×