२३ जानेवारीला महाराष्ट्रातल्या पुणे शहरात एक बातमी समोर आली. भीमा नदीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचे मृतदेह आढळले. सुरूवातीला या सामूहिक आत्महत्या आहेत असं वाटलं होतं. मात्र पोलिसांनी या आत्महत्या नसून हत्या आहेत असं पुणे पोलिसांनी सांगितलं. या घटनेत काळी जादू करण्यात आली आहे का? असाही संशय समोर आला होता. मात्र त्याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुरूवातीला या सगळ्या आत्महत्या आहे आहेत असं वाटलं होतं. मात्र नंतर या हत्या असल्याचं स्पष्ट झालं.

पुण्यातल्या दौंडमधली घटना

पुणे शहरापासून ४५ किमी दूर असलेल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावात भीमा नदीमध्ये सोमवारी चार आणि मंगळवारी तीन मृतदेह आढळले. हे सात मृतदेह एकाच कुटुंबातले आहेत. सर्वात आधी हे सगळं प्रकरण आत्महत्येचं आहे असं वाटलं होतं. पण हे सगळं प्रकरण हत्येचं आहे हे समोर आलं आहे.

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पोलीस तपासात काय काय समोर आलं?

पोलिसांनी हे प्रकरण का घडलं? याचा शोध सुरू केला. तसंच या हत्या नेमक्या का झाल्या याचाही छडा लावण्यास सुरूवात केली. सुरूवातीला पोलिसांच्या हाती कुठलाही पुरावा लागला नाही. त्यानंतर आणखी खोलात जाऊन पोलिसांनी या हत्यांचा तपास सुरू केला. सगळ्या मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलिसांना हे समजलं की हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत. मोहन पवार, त्यांची पत्नी संगीता पवार, त्यांची मुलगी राणी फलवरे, जावई श्याम फलवरे आणि या दोघांची तीन मुलं असे सातजण एकाच कुटुंबातले होते. पुणे पोलिसांनी तीन दिवस कसून तपास केला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की ही हत्या कौटुंबिक वादातून झाली आहे. मोहन पवार यांच्या चुलत भावाने आपल्या भावांसह या सगळ्या हत्या घडवून आणल्या आहेत.क्राईम तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

धक्कादायक! भीमा नदीत मृतदेह आढळलेल्या ७ जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, पोलिसांचे खळबळजनक खुलासे

सात प्रेतांवर जखमांची एकही खूण नाही

नदीतून जी सात प्रेतं मिळाली त्या प्रेतांच्या शरीरावर कुठल्याही जखमांच्या खुणा नव्हत्या. या सातही मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. पोस्टमॉर्टेममध्ये या हत्यांचं कारण समोर आलं आणि ते होतं विष.पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट समोर आला तेव्हा हे लक्षात आलं की मोहन पवार यांच्या चुलत भावाने या सातही जणांच्या जेवणात विष कालवलं होतं. त्यामुळेच एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला.सात जणांचा विषारी अन्न खाल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर मोहन पवार यांच्या चुलत भावाने आधी तीन प्रेतं आणि त्यानंतर चार प्रेतं नदीत फेकली. पोलिसांनी या प्रकरणात सातपैकी सहा आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे अशीही माहिती समोर आली आहे.

करणी-काळ्या जादूच्या संशयातून ३ चिमुरड्यांसह ७ जणांची हत्येचा आरोप, भीमा नदीवर नेमकं काय घडलं? वाचा…

अंधश्रद्धेतून हत्याकांड झालं नसल्याचीपोलिसांची माहिती

मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. मोहन पवार आणि कुटुंबीयांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. मात्र अंधश्रद्धेतून हत्याकांड झालं आहे, असं पोलिस तपासात अजूनही पुढे आलेलं नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.