scorecardresearch

औरंगाबादेतील शहागंजमधील पाच दुकानांना भीषण आग; २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान!

दुरुस्तीसाठी आलेल्या चार दुचाकी व चारचाकीही वाहने देखील आगीत खाक

aurangabad fire
दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली होती.

शहरातील शहागंजमधील मनपाच्या चेलीपुरा उर्दू शाळेच्या परिसरातील एका गोदामासारख्या जागेत असलेल्या पाच दुकानांना आज (गुरुवार) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. फळ, गॅरेज, सुकामेव्याच्या या दुकानांना लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

पदमपुरा व सिडकोच्या दोन बंबांसह १२ जणांच्या पथकाच्या मदतीने अर्धा तासात पाचही दुकानांची आग आटोक्यात आणल्याची माहिती पथक प्रमुख एल. टी. कोल्हे यांनी दिली.

अन्वरखान यांचे पेंडखजूरचे, सय्यद इर्शाद सय्यद मोमीन यांचे चप्पल-बुटाचे, सलीम बागवान यांचे फळाचे, सलीम शेख यांचे ड्रायफ्रूट तर मोहम्मद हुसेन चौधरी यांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्यांच्या दुकानात चार दुचाकी व काही चारचाकीही दुरुस्तीसाठी आलेली वाहने आगीत खाक झाली. सुकामेवा, फळं, वाहने दुरुस्तीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Massive fire at five shops in shahganj aurangabad loss of rs 20 to 25 lakhs msr