औरंगाबादेतील शहागंजमधील पाच दुकानांना भीषण आग; २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान! | Massive fire at five shops in Shahganj Aurangabad Loss of Rs 20 to 25 lakhs msr 87 | Loksatta

औरंगाबादेतील शहागंजमधील पाच दुकानांना भीषण आग; २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान!

दुरुस्तीसाठी आलेल्या चार दुचाकी व चारचाकीही वाहने देखील आगीत खाक

औरंगाबादेतील शहागंजमधील पाच दुकानांना भीषण आग; २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान!
दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली होती.

शहरातील शहागंजमधील मनपाच्या चेलीपुरा उर्दू शाळेच्या परिसरातील एका गोदामासारख्या जागेत असलेल्या पाच दुकानांना आज (गुरुवार) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. फळ, गॅरेज, सुकामेव्याच्या या दुकानांना लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

पदमपुरा व सिडकोच्या दोन बंबांसह १२ जणांच्या पथकाच्या मदतीने अर्धा तासात पाचही दुकानांची आग आटोक्यात आणल्याची माहिती पथक प्रमुख एल. टी. कोल्हे यांनी दिली.

अन्वरखान यांचे पेंडखजूरचे, सय्यद इर्शाद सय्यद मोमीन यांचे चप्पल-बुटाचे, सलीम बागवान यांचे फळाचे, सलीम शेख यांचे ड्रायफ्रूट तर मोहम्मद हुसेन चौधरी यांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्यांच्या दुकानात चार दुचाकी व काही चारचाकीही दुरुस्तीसाठी आलेली वाहने आगीत खाक झाली. सुकामेवा, फळं, वाहने दुरुस्तीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

“तुम्ही छत्रपतींनाच बेईमान ठरवलंत”, संजय राऊतांची भाजपावर आगपाखड; म्हणाले, “कौन बनेगा करोडपतीसारखं…!”
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”
IND vs NZ: टोपी घालून क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यावेळी तर…’
विकी कौशलने पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात लावली हजेरी; फोटो व्हायरल
“जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप