मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत डिप्लोमा इन सायकॅट्रिक (डीपीएन) आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग (पीएचएन) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये मुंबई शहरातील विनया पाटील ही विद्यार्थिनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आली आहे. १०० पर्सेंटाईल मिळविणारी ती एकमेव विद्यार्थिनी आहे.

डिपीएन व पीएचएनची सीईटी परीक्षा ७ मे २०२६ रोजी एकाच सत्रात घेण्यात आली होती. या सीईटी परीक्षेला एकूण ४६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती व ३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ६५ विद्यार्थी व ३२१ विद्यार्थिनी होत्या. या सीईटी परीक्षेला ८२.६६ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ही सीईटी परीक्षा राज्यातील ४६७ विद्यार्थ्यांनी दिली.

राज्याबाहेरील एकाही विद्यार्थ्यांनी ही सीईटी परीक्षा दिलेली नाही. राज्यातील ४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.