Premium

सोलापुरात भावनिक पत्र लिहून वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठवाड्यातील एका विद्यार्थ्याने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

suicide case
त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर: सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठवाड्यातील एका विद्यार्थ्याने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला. गळफास घेण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याने, आपल्या आत्महत्येची माहिती आई-वडिलांना सांगू नका, मामांना माहिती कळवा म्हणून भावनिक होऊन लिहिलेले पत्र सापडले.

आकाश संतोष जोगदंड (वय २४, रा. चौसाळा, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी वैद्यकीय विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही. आकाश हा आसार मैदानावरील एका हॉटेलमध्ये उतरला होता. सकाळी उशिरापर्यंत त्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याने आणि प्रतिसादही न दिल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी येऊन बंद खोलीचा दरवाजा तोडला असता खोलीत आकाश छतावरील विद्युत पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आणखी वाचा-सांगली: नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

मृत आकाश याने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयात २०२० साली एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. परंतु वारंवार परीक्षा देऊन अपयश येत होते. सलग तीन वर्षे अपयशीच ठरल्याने तो नैराश्येत होता, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 20:06 IST
Next Story
सांगली: नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा