अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी साताऱ्यात बुधावारी सभा

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सातारा जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची सहविचार सभा बुधवारी (दि. २५ जून) सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स महाविद्यालयात आयोजित केली आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सातारा जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची सहविचार सभा बुधवारी (दि. २५ जून) सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स महाविद्यालयात आयोजित केली आहे. सर्व प्राचार्यानी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेच्या सर्व माहितीसह हजर रहायचे आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
सातारा येथे २७ ते २९ या काळात अर्ज देणे, स्वीकारणे ३० जून ते २ जुल या काळात अर्जाची छाननी, ३ जुल रोजी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी फलकावर लावणे, ४ ते ८ जुल रोजी निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ९ व १० जुल रोजी प्रवेश दिला जाईल. रिक्त जागांवर १४ व १५ जुल राजी प्रवेश दिला जाईल. महाविद्यालये १६ जुलपासून सुरू होतील असे वेळापत्रकात स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Meeting for eleventh admission in satara

ताज्या बातम्या