scorecardresearch

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग; उद्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन विषयांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन विषयांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असं असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बैठक शुक्रवारी सकाळी पार पडणार आहे. संबंधित बैठक वर्षा बंगल्यावर होणार की मातोश्रीवर याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही.

राज्यात सध्या स्फोटक राजकीय घडामोडी घडत असताना, शिवसेनेनं अशाप्रकारची बैठक बोलावली आहे. त्यामुळे अनेकांचं याकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, मशिदीवरील भोंगे, मनसे आंदोलन, राणा दाम्पत्य प्रकरण आणि आगामी महापालिका निवडणुका आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meeting of all shiv sena mps will be held tomorrow in the eve of election and hanuman chalisa dispute rmm

ताज्या बातम्या