सावंतवाडी: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणात येत्या शनिवार आणि रविवारी (१८-१९ फेब्रुवारी)  होणार आहे. सेवांगणचे अध्यक्ष अ‍ॅड. देवदत्त परुळेकर आणि अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक १७ वर्षांनंतर मालवण येथे होणार आहे.

बैठकीची सुरुवात शनिवारी सकाळी १० वाजता सेवांगणचे विश्वस्त सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. दिवसभर या बैठकीत अंनिसच्या बारा विभागांच्या पुढील सहा महिन्यांच्या कामकाजाचे नियोजन केले जाणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ११ वाजता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘आधारस्तंभ’ आणि ‘शतकवीर’ या पुरस्कारांनी गौरव करण्यात येईल. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अ‍ॅडव्होकेट देवदत्त परुळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा
prakash ambedkar
‘वंचित’ स्वंतंत्र लढणार! लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नागपूरमध्ये ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, प्रशांत पोतदार, अण्णा कडलास्कर, फारूख गवंडी, प्रा. प्रवीण देशमुख, दीपक गिरमे, अरविंद पाखले, गणेश चिंचोले, प्रभाकर नानावटी यांच्यासह राज्यभरातील २३ जिल्ह्यांमधून अंनिसचे २०० कार्यकर्ते या राज्य बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, अंनिसचे सुहास पवार, सुहास यरोडकर, सम्राट हटकर, प्रा. अशोक कदम, प्रकाश घादगिने इत्यादींनी बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली आहे.