राज्यात असणाऱ्या उच्चांकी वीज दराबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांची बठक सोमवारी सांगलीच्या डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. उद्योजकांच्या १३ संघटनांचे प्रतिनिधी या बठकीस हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या प्रती महिना ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसह औद्योगिक व शेती पंपांना सवलत देण्यात येते. सवलतीची ही रक्कम सुमारे ३२०० ते ३३०० कोटीपर्यंत असून यंत्रमागधारकांना दिली जाणारी सवलत ११०० कोटीपर्यंत आहे. शासनाने जादाचा भार न सोसण्याचा निर्णय घेतला असून उद्योगांसाठी असणारे ७०६ कोटींचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होणार आहेत. याबाबत या बठकीत चर्चा होणार आहे.
सांगली पोलिसांना क्रीडा स्पर्धेत विजेतेपद        
    सांगली पोलिसांच्या क्रीडापटूंनी परिक्षेत्रीय क्रीडा स्पध्रेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. महिला गटात कोल्हापूर संघाने बाजी मारली.
    स्पध्रेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पार पडला. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, महापौर कांचन कांबळे, राज्य राखीव दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद, कोल्हापूरचे अधीक्षक मनोजकुमार शर्मा, सांगलीचे अधीक्षक दिलीप सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.