कोकण रेल्वेमार्गावर कणकवली साकेडी फाटक ते कसवण रेल्वे ट्रॅकदरम्यान १ ते ४ मार्चदरम्यान नवीन ट्रॅकच्या कामासाठी मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या दरम्यान कोकण रेल्वेचा वेग मंदावणार आहे. कणकवली साकेडी फाटक ते कसवण रेल्वे ट्रॅकदरम्यान नवीन रेल्वे ट्रॅकचे काम २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ४ मार्चपर्यंत या ठिकाणी रेल्वेचा वेग कमी करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे विभागाने तसा मेगाब्लॉक घोषित केला आहे.