scorecardresearch

MHT CET 2020 : उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुढे ढकलल्या

शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मागणी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यात करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विद्यार्थांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही सामंत यांनी संगितले.

आणखी वाचा- व्यावसायिक अभ्यासक्रम व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आवाहन, म्हणाले…

यापूर्वी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात १३ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परंतु लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानं ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mht cet 2020 examination postponed new dates to release soon minister uday samant nck

ताज्या बातम्या