सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. यासंदर्भात नवी दिल्लीच्या नॕशनल सेंटर फाॕर सिस्माॕलाॕजीकडून पडताळणी केली असता १.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाल्याचे रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. भूकंप झालेल्या भागात एनटीपीसीचा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. परंतु यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.

द. सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी व आहेरवाडी परिसरात एनटीपीसीचा राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. या परिसरासह होटगी स्टेशन, तिल्हेहाळ, आचेगाव, मंद्रूप, औज आदी गावांमध्ये दुपारी १.२० वाजेच्या सुमारास घरांवरील पन्हाळी पत्र्यांवर अचानकपणे दगड पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे गावकरी काहीवेळ भयभीत झाले होते.

Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

तेव्हा तहसीलदारांनी ही माहिती पडताळणीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविली. त्यानुसार नवी दिल्लीच्या नॕशनल सेंटर फाॕर सिस्माॕलाॕजीशी संपर्क साधला असता सोलापुरात वालचंद इन्स्टिट्यूट आॕफ टेक्नाॕलाॕजीच्या आवारात कार्यरत असलेल्या नॕशनल सेंटर फाॕर सिस्माॕलाॕजीच्या भूकंप मापन केंद्रात १.३ रिश्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाल्याची माहिती समोर आली. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी रात्री उशिरा यासंदर्भात प्रसार माध्यमांना निवेदन प्रसिध्दीसाठी दिले..