Premium

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद

दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला.

earthquake
दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. यासंदर्भात नवी दिल्लीच्या नॕशनल सेंटर फाॕर सिस्माॕलाॕजीकडून पडताळणी केली असता १.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाल्याचे रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. भूकंप झालेल्या भागात एनटीपीसीचा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. परंतु यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द. सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी व आहेरवाडी परिसरात एनटीपीसीचा राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. या परिसरासह होटगी स्टेशन, तिल्हेहाळ, आचेगाव, मंद्रूप, औज आदी गावांमध्ये दुपारी १.२० वाजेच्या सुमारास घरांवरील पन्हाळी पत्र्यांवर अचानकपणे दगड पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे गावकरी काहीवेळ भयभीत झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 02:20 IST
Next Story
सोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला