साताऱ्यातील फलटणच्या कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना पैसा पुरवला जात असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय कृषी गोसेवा पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे.

काय म्हणाले मिलिंद एकबोटे?

“फलटणच्या कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो, ही लाजिरवाणी बाब आहे. या संपूर्ण प्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वरदहस्त आहे. सदर बझार येथेही घरोघरी गाई कापल्या जात असून प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. याची प्रशासनाने दखल घेऊन हे कत्तखाने तत्काळ बंद करावे”, अशी मागणी त्यांनी केली.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Nana Patole
अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

हेही वाचा – दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

“शिवप्रताप दिन हा मोठा उत्सव आहे. तरुणांमध्ये देशभक्ती जागवणारा, त्यांच्यावर संस्कार करणारा हा सण आहे. या उत्सवाकडे गेली तीन वर्ष प्रशासनाने दुर्लेक्ष केले आहे. मात्र, यंदा आम्ही प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करू”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली आहे, असेही ते म्हणाले.