सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात एमआयएम पक्षाने चार जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी फारूख शाब्दी यांनी केली.

सोलापूर शहर मध्य या प्रतिष्ठेच्या जागेसह अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर उत्तर या चार जागा लढविण्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. यापैकी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पक्षाने हाजी फारुख शाब्दी यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच जाहीर केली आहे. मागील २०१९ साली याच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून फारुख शाब्दी यांनी मोठी झुंज दिली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना ४८ हजार ८३२ मते मिळाली होती. तर द्वितीय स्थानावर राहिलेले शाब्दी यांच्या पारड्यात ३६ हजार ८८९ मते पडली होती. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मुस्लिमबहुल मानला जातो. या अगोदरही २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एमआयएमने या क्रमांकाची मते घेऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना झुंजविले होते.

Uddhav Thackeray
“धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा मोठा अधर्म”, उद्धव ठाकरेंचा टोला
Shivsena angry , Aditi Tatkare ,
रायगड : आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यानंतर शिवसैनिकांचा संताप,…
7th pay commission Maharashtra news
सातव्या आयोगामुळे राज्यावर साडेतीन लाख कोटींचा बोजा!
sanitary napkin vending machines
‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’वर संकोच अन् अनास्थेची धूळ
chhagan Bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही! छगन भुजबळ यांची अजित पवारांवर टीका
Dhananjay Munde On Beed Guardian Minister Ajit Pawar
Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Beed Guardian Minister : मंत्री धनंजय मुंडेंना धक्का; पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट, अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रिपद
attempt to put a dumper on the head of Naib Tahsildar was unsuccessful.
कुडाळ पिंगुळी येथे नायब तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Guardian Minister Post
Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचं पालकमंत्री कोण? वाचा यादी

हेही वाचा >>>Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं?

यंदा सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबरोबर मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून एमआयएम पक्षाने अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर उत्तर या तिन्ही भाजपच्या ताब्यातील मतदार संघांमध्ये उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खरोखर उमेदवार दिले गेल्यास त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची आणि ही बाब भाजपसह महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Story img Loader