scorecardresearch

अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्या यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांनी कपड्यांची बॅग…”

शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मुंबई येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापा टाकला आहे.

KIRIT SOMAIYA AND ANIL PARAB
किरीट सोमय्या आणि अनिल परब

शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मुंबई येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापा टाकला आहे. ईडाच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरी येथेदेखील ईडीची कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण करत परब यांना तुरुंगात जावं लागणार अशी भविष्यवाणी केली आहे.

हेही वाचा >>> Anil Parab ED Raid: ईडीने अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु करताच किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिक, देशमुखांप्रमाणे…”

अनिल परब यांनी कपड्यांची बॅग भरावी

अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट्वच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी,” असं परब यांनी म्हटलंय.

हेही वाचा >>> Anil Parab ED Raid: शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

तसेच परब यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी सर्वात अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली, असा दावा किरीट सोमय्या यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला. “उद्धव ठाकरे यांनी चाणक्यला मागे टाकलं. अनिल परब वाढत चालले होते. अनिल परब यांनी चोरी लबाडी केली आहे. त्यांनी चोरी केली आहे. खोटा रिसॉर्ट बांधला आहे. त्यांच्यावर कारवाई करा, असा आदेश आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने दिला. या कारवाईला उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. आज अनिल परब यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यानेदेखील विचार करावा,” असे किरीट सोमय्या टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा >>> Anil Parab ED Raid: अनिल परबांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले “भाजपा रोज खड्ड्यात…”

दरम्यान, सध्या परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरु आहे. त्यामुळे या कारवाईतून काय समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minister anil parab soon will go to jail after ed raid claims bjp leader kirit somaiya prd

ताज्या बातम्या