scorecardresearch

“तुम्ही संपत्तीचे वारसदार, आम्ही बाळासाहेब आणि…”; गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदांरावर सतत गद्दार म्हणून टीका करत आहेत. त्याला आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“तुम्ही संपत्तीचे वारसदार, आम्ही बाळासाहेब आणि…”; गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका
गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे ( संग्रहित फोटो )

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत बंड करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार म्हणत हल्लाबोल सुरु आहे. त्यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर तोफ डागली आहे.

“उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा मला अधिकार नाही, असेही म्हणत आहेत. मात्र, तुम्ही बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही हिंदुत्वाचे आणि त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत,” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा – “पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका

“सायकलवर फिरून आम्ही शिवसेना मोठी केली. शंभरपेक्षा अधिक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर एकही गुन्हा दाखल नाही. आदित्य ठाकरे यांचे वय 32 आणि माझं शिवसेनेतील वय 35 आहे,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या