लोकसत्ता वार्ताहर

कराड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकास अटक केली आहे.

caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
Fraud with Blind couple, baby adoption,
अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
Gang Rape in Nalasopara
Nalasopara Rape Case : बदलापूरनंतर आता नालासोपारा हादरले! तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी तिघांच्याही मुसक्या आवळल्या!
low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?

विनोद विलास काटकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षापासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर यांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर झाली. विनोद काटकर याने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला.

आणखी वाचा-Sanjay Gaikwad : “आता काय मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का?”, बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!

याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर यास आज मंगळवारी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस फौजदार भिलारी करीत आहेत.