शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

अलिबाग  : पालीतील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतील जेष्ठ शिक्षकाने पेपर चालू असतांनाच सोमवारी (ता. २९) विनयभंग केला आहे.  मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी या शिक्षकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की या मुलीचा गणित विषयाचा पेपर चालू असतांना या ज्येष्ठ शिक्षकाने तिचा विनयभंग केला. या आधी देखील त्याने असा प्रकार केला असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी या शिक्षका विरोधात पाली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाली पोलीस ठाणे कॉ. गुन्हा रजिस्टर नंबर १२०/२०२ भा. द. वि. सं. कलम ३५४ (अ)(१) सह लैंगिक अपराधां पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, ९ (एफ)(एम), १०नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor girl molestation by teacher zws

ताज्या बातम्या