चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धुळ्यामधील शिरपूर तालुक्यातील घटना

minor-girl
प्रतिनिधिक छायाचित्र

अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खवशापाडा या ठिकाणी हा प्रकार घडला. नटराज झबू पावरा असं बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव असून याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भाग असलेल्या खवशापाडा-वाकपाडा येथील रहिवासी असलेल्या एका १५ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १२.३० च्या  सुमारास ती घरात एकटी असताना नटराज झबु पावरा (वय २०, रा.वाकपाडा ता.शिरपूर)  घरात शिरला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरुन गेलेल्या तरुणीने स्वतःला सावरत याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात नटराज पावराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीनुसार, नटराज पावरा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor girl rape case in dhule

ताज्या बातम्या