औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना आज (शुक्रवार) दुपारी त्यांच्या दालनाच्या परिसरात अरेरावीची भाषा वापरून हल्ल्याच्या उद्देशाने अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

या प्रकरणी राहुल इंगळे व त्याचा साथीदार योगेश हरिश्चंद्र मगरे यांच्या विरोधात आयुक्तांवर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, विनापरवाना शासकीय कार्यालयात छायाचित्रण करणे, शासकीय कार्यालयातील शांतता भंग करणे, आदी कारणावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सुरक्षा रक्षक शेकनाथ किसान तांदळे व सुखदेव केशव बनकर यांच्यामार्फत सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे मनपाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. तर सिटी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास बोलताना अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न

या प्रकरणात मनपाकडून दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील एन-2, मुकुंदवाडी भागातील रहिवासी असलेले राहुल इंगळे व योगेश मगरे हे दुपारी जेवणाच्या वेळेत मनपा कार्यालयात आले. यावेळी मनपा प्रशासक पाण्डेय हे जेवणासाठी निघाले होते. इंगळे याने हातात कागदी फलक घेऊन प्रशासकांकडे देण्याचा प्रयत्न केला. प्रशासकांनी, इंगळे यास, तुमचे प्रश्न माहीत असून, ते सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतरही त्यांनी प्रशासकास अडवण्याचा प्रयत्न केला. तर इंगळेचा साथीदार योगेश मगरेने अनधिकृतरी त्या मोबाईल फोनमध्ये छायाचित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षकाने समज दिली. मात्र त्यानंतरही छायाचित्रण सुरूच ठेवले. दरम्यान राहुल इंगळे अरेरावीची भाषा वापरून प्रशासक पांण्डेय यांच्या अंगावर धावून गेला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने प्रशासक बचावले. तसेच दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली तर त्यांनी आरडा-ओरड करुन अरेरावी भाषेत उत्तरे दिली. यावेळी ठाण्यात तक्रार देणारे शेकनाथ तांदळे, सुखदेव बनकर हे घटनास्थळी हजर होते.

घटनेचा निषेध नोंदवत मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला अधिकारी, कर्मचारी, सेवकांपर्यंत सर्वांनी दुपारनंतर काम बंद आंदोलन केले.