scorecardresearch

Mission Admission: अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ‘या’ दिवशी होणार जाहीर

अकरावीच्या प्रवेशा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

Mission Admission: अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ‘या’ दिवशी होणार जाहीर
अकरावी प्रवेश प्रक्रिया (फाईल फोटो)

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालये किंवा FYJC मध्ये प्रवेशासाठी प्रथम कट ऑफ यादी जारी करण्याच्या तारखेची पुष्टी केली. घोषणेनुसार, MMR (मुंबई महानगर प्रदेश) आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या अकरावी प्रवेशासाठीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुरुवातीच्या फेरीसाठी FYJC मेरिट लिस्ट २०२१ ही २७ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर केली जाईल. अकरावीच्या प्रवेशा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार २७ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

FYJC प्रवेश २०२१ साठी पहिली गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ यादी अधिकृत वेबसाइट 11thadmission.org वर जारी केली जाईल. ज्या उमेदवारांनी सामान्य फेरीसाठी नोंदणी केली आहे ते गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन तपासू शकतात. महाराष्ट्र FYJC प्रवेश २०२१ साठी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, अलॉटमेंट यादी सकाळी १० वाजता जारी केली जाईल.

सोशल मीडियाचा आधार घेत वर्षा गायकवाड यांनी काल माहिती शेअर केली. त्यांनी हे देखील सांगितले की प्राप्त झालेल्या ३.७५ लाख अर्जांसाठी कट ऑफची पहिली यादी जाहीर केली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी; फक्त ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. गायकवाड यांनी शेअर केले की, ‘प्रवेशाच्या या फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केली जाईल. त्यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. #FYJC #Admissions2021′

महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेशासाठी आणखी तीन फेऱ्या होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेशाची पहिली सामान्य फेरी MMR (मुंबई महानगर प्रदेश) आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक येथील महामंडळाच्या हद्दीतील भागांसाठी असेल.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एकूण ३.७५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी २.३ लाख मुंबईचे आणि ७७,२७६ पुण्याचे तर अमरावती, नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे १०६७३, २७२३९  आणि २२२११ नोंदणी झाली आहे.  त्यात मुंबईतून २.०२ लाख आणि पुण्यातून ०.५९ लाख अर्ज आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mission admission final general merit list for the 11th admission in junior colleges to be announced on 27 august ttg