सोलापूर : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या पातळीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका घेत असताना माढा लोकसभा आढावा बैठकीस पक्षाचे माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष.आमदार संजय शिंदे हे दोघेही गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीही या आढावा बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षीय स्तरावर लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी माढा, कोल्हापूर,
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.