सायबर चोरी हा आता नित्याचा प्रकार झाला आहे. सायबर चोरीचे रोज नवे नवे प्रसंग आपल्याला ऐकायला मिळत असतात. सामान्य लोक सायबर फसवणुकीला बळी पडत असतातच पण आमदारांनाही सायबर चोरटे गंडा घालतात. आमदारांना गंडा घालणारी एक टोळीच सक्रिय आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनाही सायबर चोरट्यांनी गंडा घातला होता. या प्रसंगाचा किस्सा खुद्द भरणे यांनी पोलिसांबरोबर झालेल्या एका बैठकीत सविस्तर सांगितला आहे. तसेच इतरांनी खबरदारी घ्यावी, असाही सल्ला भरणे यांनी दिला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

फोनवरून आपल्याला १५ हजारांचा गंडा घातल्याची माहिती आमदार भरणे यांनी एका बैठकीत दिली. ते म्हणाले, मला एकेदिवशी फोन आला. समोरील व्यक्तीने सांगितले की, मामा आमच्या गाडीचा इंदापूर रोडवर अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर लोक रुग्णालयात आहेत. आम्हाला औषधोपचारासाठी ताबडतोब १५ हजारांची गरज आहे. मतदारसंघातील लोक असावेत, असे वाटल्यामुळे मी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोणत्या रुग्णालयात दाखल असून किती गंभीर मार लागला याचीही विचारपूस केली.

Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”

आमदार भरणे पुढे म्हणाले की, फोनवर बोलणाऱ्यांनी मला भावनिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि ताबडतोब पैसे पाठवा अशी विनंती केली. मी रुग्णालयात माणसाकरवी पैसे पाठवतो, असे सांगितल्यावर त्यांनी नातेवाईकांबरोबर बाहेर आलोय, असे सांगण्याचा बनाव केला. आमच्या रुग्णवाहिनीला डिझेल भरायला पैसे नाहीत, असेही त्यांनी सांगितले. मग मला एक नंबर देऊन मोबाइलवर पैसे पाठविण्याची विनंती केली. मीही कार्यकर्त्याच्या मोबाइलमधून त्यांना १५ हजार पाठवून दिले.

पैसे पाठवून दिल्यानंतर मी काही वेळाने इंदापूरला अपघात झाला का? याची चौकशी केली. पण तालुक्यात अपघातच झाला नसल्याची मला माहिती मिळाली. तेव्हाच आपण गंडलो गेलो आहोत, याची मला कल्पना आली, असे आमदार भरणे मामा म्हणाले. फक्त मलाच नाही तर इतर आमदारांनाही अशाचप्रकारे फसविण्याचा प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले. मुंबईत मला आणखी एका आमदाराने सांगितले की, मोबाइलवर पैसे मागण्यासाठी काही लोकांनी फोन केला होता. पण मी पैसे काही पाठविले नाहीत. त्या आमदाराने सांगितले की, पालघर जिल्ह्यात सदर टोळी सक्रीय आहे. आमदारांना फोन करून भावनिक करत पैसे उकळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याची माहिती भरणे यांनी दिली.

दुभंगण्याच्या वाटेवर असलेल्या पवार कुटुंबाचा काय आहे इतिहास?

चोरटे आता पुढे गेले आहेत. मोबाइलवर दुरूनही चोरी करता येते. त्यामुळे पोलिसांनी अशावेळी अधिक जागृत राहण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा कशी पुरविता येईल, याचा प्रयत्न करावा, असे निर्देश दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांना दिले.