संगमनेर : बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेश मधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. यात तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

आमदार तांबे यांनी बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  बांगलादेश मधील आध्यात्मिक गुरू कृष्णदास यांना तेथील सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक करून तुरुंगात टाकले आहे. यामुळे केवळ त्यांच्या अनुयायींना त्रास झाला नाही तर बांगलादेश मधील समस्त हिंदू बांधवांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. एक सहकारी आणि मानवी हक्कांना महत्त्व देणारा राज्याचा नेता या नात्याने आपणास विनंती आहे की, आपण भारत व बांगलादेश सरकार मधील उच्च अधिकाऱ्यांना तातडीने पत्र लिहून व योग्य राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेश मधील हिंदू समाजाला मानवतावादी मदत आणि समर्थन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे.

हेही वाचा >>> Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदू धर्मियांना त्रास दिला जात यामुळे तेथील हिंदू धर्मीय असुरक्षित झाले आहे. कट्टरतावादी अनेक नेते बेताल वक्तव्य करून हिंदू धर्माविरोधी चिथावनी देत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत. तेथील हिंदू बांधव- महिला अत्यंत भयभीत वातावरणात आहे. त्यामुळे आपण तातडीने राजनैतिक पातळीवरून या प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेश मधील आध्यात्मिक धर्मगुरू कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू धर्मीयांचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने पुढाकार घेऊन तेथील हिंदू समाजाला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपाययोजना करून दिलासा द्यावा अशी विनंती आमदार तांबे यांनी पत्रातून केली आहे.

Story img Loader