शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी ५० खोकी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या आरोपांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांचं आयुष्य खोक्यांवर गेले, त्यांना आता खोकेच दिसणार” असा पलटवार पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. “कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाहीत” असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील टीकेचा पाटील यांनी समाचार घेतला आहे.

“शिंदे गट ‘खोकेवाले’ म्हणून देशभरात…”; विधानसभेच्या पायऱ्यांवरील ठाकरेंविरोधातील बॅनरबाजीवरुन शिवसेनेचा संताप

आमचं काय होणार याची चिंता सामनाने करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेची अवस्था अशी का झाली? अस्तित्वावर प्रश्नचिन्ह का निर्माण झालं? याबाबत स्वत:लाच प्रश्न विचारा, असा सल्लाही त्यांनी दिला. अचानक हातातून सत्ता गेल्याच्या धक्क्यातून अद्याप महाविकासआघाडी सावरली नसल्याचेही ते म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात झालेली वैचारिक क्रांती आहे. रखडलेला विकासाचा गाडा आणि एकतर्फी मनमानी कारभार थांबवण्यासाठी लोकाभिमूख कारभार करण्यासाठी हे सरकार स्थापन करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.

“आता काय या बैलाला…”, अमोल मिटकरींनी ‘तो’ फोटो ट्वीट करत दिलं शिंदे गटातील आमदारांना खुलं आव्हान!

दरम्यान, नुकतच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन खोक्यांवरील घोषणांनी बरंच गाजलं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा देत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या घोषणांवरून शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे परस्परांना भिडले होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळ देखील झाली होती.