scorecardresearch

Premium

सातारा : निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही – शशिकांत शिंदे

आम्ही शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी त्याची आम्हाला काही पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

MLA Shashikant Shinde comment on Sharad Pawar
सातारा : निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही – शशिकांत शिंदे (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

वाई : आम्ही शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी त्याची आम्हाला काही पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. त्यांच्यामुळेच अनेकदा पदे मिळाली, त्यांच्यासाठी त्याग करायचा असल्यास आमची तयारी आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार हे नक्की असल्याने याबाबतची सुनावणी लांबवण्यात येत असल्याची टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली होती.

यावर राज्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही. जे काही झालेले आहे ते कायद्याला धरून झालेले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करून आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय देतील असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला होता. आमच्या अपात्रातेचं राहूदे स्वतःचं बघा असा टोला यावेळी आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना लगावला होता. यावर शशिकांत शिंदे बोलत होते.

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
uddhav thackeray and ajit pawar
“अजितदादा माझ्यावेळेला चांगले होते, पण…”, नाराजी नाट्यावर उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “ज्यांच्या उरावर…”
Uddhav Thackeray eknath shinde 1
“ये डर अच्छा हैं”, एकनाथ शिंदेंचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले…
ajit pawar jayant patil
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…

हेही वाचा – सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब

हेही वाचा – “अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष कुणी केलं? त्याचा काही…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी आमची काळजी करू नये, स्वतःच्या अपात्रतेची काळजी करावी. ते अपात्र जरी नाही झाले तरी जनतेच्या दरबारात अपात्र ठरतील. आम्ही निष्ठावंत आहोत. ज्या जनतेने निवडून दिले मात्र खोके घेण्यासाठी गद्दारी करायला गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla shashikant shinde commented on his loyalty to sharad pawar ssb

First published on: 26-09-2023 at 19:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×