एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर सहा महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (०५ फेब्रूवारी) नेवासा येथील एका भाषणादरम्यान, राज्य सरकारवर सडकून टीका केली.

अजित पवार म्हणाले की, नव्या सरकारने बऱ्याच जणांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्या सोबत घेतलं. त्यापैकी प्रत्येकाला मंत्रीपदाचं गाजर दाखवलं होतं. मंत्रीपदाच्या आशेने ४० बंडखोर आमदारांपैकी बऱ्याच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. त्यांना आता त्यांची बायको विचारते या सूटची घडी कधी मोडणार? यांनी नवस केले, अभिषेक करत बसलेत. पण नवस फेडायला अजून मंत्रीपद काही मिळालेलं नाही. मंत्रीपद मिळाल्यावर नवस फेडायला येईन असं म्हणाले होते. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि यांना मंत्रीपद मिळालं नाही.

israeli minister benny gantz resigns from war cabinet
अन्वयार्थ : इस्रायलमधील एकोप्याला सुरुंग
modi cabinet meeting
सकाळी शेतकऱ्यांना खूशखबर, आता सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय; मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं?
onion export ban decision impact on 10 lok sabha constituency results
कांद्याने या मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांना रडविले…
Selection of Narendra Modi as the head of Raloa
मोदी ३.० मंत्रिमंडळाचा शनिवारी शपथविधी? ‘रालोआ’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड; घटक पक्षांच्या पाठिंब्याचे पत्र
Rahul Gandhi allegation that the Prime Minister announced the overthrow of the Himachal government
हिमाचल सरकार पाडण्याचे पंतप्रधानांकडूनच जाहीर; राहुल गांधी यांचा आरोप
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Chief Minister Eknath Shinde refused to answer a question on the implementation of the package
पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव; मराठवाडातील टंचाई आढावा बैठक वेळकाढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका
eknath shinde slams uddhav Thackeray
बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, हे सरकार (शिंदे-फडणवीस) केवळ घटनाबाह्य नाही तर स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक प्रकल्पावर स्थगिती लावली जात आहे. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या मतदार संघात आणलेल्या प्रकल्पांवर स्थगिती लावली आहे.

हे ही वाचा >> “टीव्ही लावला की आमच्यातील साहित्य ओसांडून वाहताना पाहू शकता”, साहित्य संमेलनात बोलताना फडणवीसांचं मिश्किल विधान!

माझ्या जिल्ह्यातला २ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेला

अजित पवार म्हणाले की, माझ्या जिल्ह्यात येणारा २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातला नेला. या प्रकल्पाद्वारे २ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. राज्यातले अनेक मोठमोठे प्रकल्प परराज्यात पळवले जात आहेत. घटनाबाह्य सरकार केवळ आश्वासन देतंय की दुसरे मोठे प्रकल्प राज्यात येणार आहेत. परंतु तसं होईल असं दिसत नाही. कारण असे प्रकल्प राज्यात आणायला धमक लागते, जी या सरकारमध्ये नाही.