महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाण्याचे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघात आमदार दिसले नाहीत. नागरिकांमध्येही रोष आहे. महाराष्ट्राला लागलेली धुळ वाहून जाण्यासाठी आज पाऊस पडत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ठाण्यात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अविनाश जाधव आणि संजय केळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जाधव यांनी प्रतिक्रिया देत केळकर यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यातील वातावरण सध्या चांगलं आहे. पाच वर्षांमध्ये ठाण्यातील आमदार जनतेला दिसले नाहीत. त्यांनी कोणती कामंही केली नाहीत. नागरिकांमध्ये एकप्रकारचा रोष पसरला आहे. मतदानासाठी गेलो असताना केळकर यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. त्यामुळे बदल नक्कीच होणार आहे. मराठी माणसाच्या विकासासाठी तसंच मराठी मागणासाच्या पाठिशी खंबीर उभं राहण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

जी व्यक्ती पाच वर्षांमध्ये कोणालाही दिसली नाही. ती पुढील पाच वर्ष काय काम करेल. आज पडणारा पाऊस राज्यातील घाण आणि राज्याला लागलेली धुळ वाहून जाण्यासाटी पडत असल्याचं जाधव म्हणाले.तसंच त्यांनी ठाणेकरांना मतदानासाठी येण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ठाण्याचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी सकाळी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.