शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "राज ठाकरेंनी..." | MNS Bala Nandgaonkar first reaction on Supreme Court judgement on Shivsena Symbol | Loksatta

शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरेंनी…”

सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्हाबाबतचा निर्णय आयोगाकडे सोपवला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरेंनी…”
मनसे नेते बाळा नांदगावकर व सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करत थेट पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच दावा केला. मात्र, ठाकरे गटाने या मागणीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. अखेर मंगळवारी (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याचं म्हणत पक्षाच्या चिन्हाबाबतचा निर्णय आयोगाकडे सोपवला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “राज ठाकरेंनी सांगितलं आहे की विचारधारा असेल तर लोकांकडे जाऊ शकतो, लोक सोबत येतात,” असं मत नांदगावकरांनी व्यक्त केलं.

बाळा नांदगावकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग निर्णय घेईल. आपल्याकडे विचारधारा असेल तर आपण ती विचारधारा घेऊन लोकांकडे जाऊ शकतो. राज ठाकरेंनीही याबाबत सांगितलं आहे. तेव्हा माध्यमंही उपस्थित होती. विचार घेऊन लोकांकडे गेलं की लोकं विचारांसोबत येतात.”

हेही वाचा : शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशात पहिल्यांदा…”

छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही बाळा नांदगावकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, “देवी-देवतांचा सन्मान राखणं आपलं काम आहे. त्यावर बोलणं मला उचित वाटत नाही. छगन भुजबळ माझ्यापेक्षा फार मोठे नेते आहेत. याशिवाय बुद्धीनेही ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने त्यांना जे कळलं असेल त्याप्रमाणे ते बोलले असतील. आपण देवी-देवतांचा सन्मान राखायला आलो आहे आणि आपण तो राखत आहोत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”

संबंधित बातम्या

“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख!
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
Optical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का? शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
ENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
“सत्तेचा पट सतत बदल राहतो खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान!
Video: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर
Optical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का? शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा