मनसे उमेदवाराचा थेट शिवसेना शाखेत जाऊन बाळासाहेबांच्या फोटोला नमस्कार!

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उमेदवाराने थेट शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला नमस्कार केला आहे. मंदार हळबे असं या उमेदवाराचं नाव असून ते डोंबिवलीतून मनसेकडून निवडणुकीत उभे आहेत. मंदार हळबे यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डोंबिवलीमध्ये भाजपा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध मंदार हळबे अशी लढत रंगणार आहे. परिणामी शिवसेनेच्या मतांना अधिक महत्व प्राप्त झालं आहे. अशातच हळबे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला नमस्कार करतानाचा फोटो व्हायरल झाल्याने मनसेने एकप्रकारे शिवसेनेच्या कार्यकत्यांना साद घातल्याची चर्चा रंगली आहे. हळबे यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मनसेचे नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधीपक्ष नेते प्रकाश भोईरसुद्धा सोबत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत डोंबिवलीतही चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा- मी वादळातही शिवसेना वाढवून दाखवणार; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला अप्रत्यक्ष आव्हान

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns candidate mandar halbe visited shivsena office for salutation to balasaheb thackerays photo sas

Next Story
लोकसभा निवडणूक निकालातून विधानसभेचा वेध
ताज्या बातम्या