scorecardresearch

Premium

राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र चर्चेत, खास संदेश देत म्हणाले “आम्ही जातीय विद्वेषात…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नवं व्यंगचित्र चर्चेत आलं आहे.

raj thackeray (10)
व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे फटकारे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी असल्याने मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना जागा नाकारल्याच्या घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांनी गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

या सर्व घडामोडीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत मराठी अस्मितेला हात घातला आहे. मराठी अस्मिता कशी ठिगळं लावलेली आहे, हे व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात तमिळ, पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचं चित्र रेखाटलं आहे. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला मात्र ठिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवलं आहे. मराठी अस्मिता ब्राह्मण, आगरी, माळी, मराठा, दलित, मातंग, वंजारी आणि इतर जातींमध्ये कशी विभागली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे.

shrikant shinde aaditya thackeray
“तू कोण आहे, तुला कशाला…”, एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका
rahul narvekar and uddhav thackeray (1)
“…हा मृत्यू अटळ आहे”, राहुल नार्वेकरांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका
Sanjay Raut Ramdas kadam
“मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…
What Sadanand More Said?
“देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणाविषयीचा हेतू प्रामाणिक होता, पण…”, विचारवंत सदानंद मोरेंनी काय म्हटलं?

हेही वाचा- येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…

राज ठाकरेंचं व्यंगचित्र ‘एक्स’वर (ट्विटर) शेअर करत मनसेनं म्हटलं की, राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं. आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे, पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray cartoon on marathi identity and mumbai marathi not allowed rmm

First published on: 30-09-2023 at 12:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×