scorecardresearch

Premium

“मनोज जरांगेचं उपोषण सोडवताना सरकारने पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं..”, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंनी सरकारलाही खास शेलक्या शब्दात टोला लगावला आहे.

What Raj Thackeray Said?
राज ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत

मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषणाच्या १७ व्या दिवशी आपलं उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली असून उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत फळांचा ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. या प्रकरणी आता राज ठाकरेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच महाराष्ट्र सरकारला टोलाही लगावला आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.

supriya sule and ajit pawar devendra fadnavis
“राज्यात भाजपाच बॉस”, फडणवीसांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या…
supriya sule in loksabha (1)
Video: “तेव्हा भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष ऑन रेकॉर्ड मला म्हणाले की…”, ‘त्या’ प्रकारावरून सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल!
Narayan Rane and manoj jarange patil
“मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणावर जबरदस्ती…”
Vijay Wadettiwar Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar 2
“महाराष्ट्र सरकार झोपलंय का?”; कर्नाटकच्या ‘त्या’ निर्णयाचा उल्लेख करत विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.

माईकप्रकरणावरुन सरकारला टोला

असं म्हणत राज ठाकरेंनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटच्या शेवटच्या दोन ओळी दोन दिवसांपूर्वी व्हारयल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते आपण बोलून मोकळं व्हायचं. त्यावेळी माईक सुरु आहे अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली होती. त्यावरून राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray first reaction on manoj jarange patil hunger strike also taunt to cm eknath shinde scj

First published on: 14-09-2023 at 18:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×