“मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे.

raj thackeray interview with his mother
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांनीही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “राज शाळेत असताना शुक्रवारी बाळासाहेब त्याला घ्यायला गाडी पाठवत होते. शनिवार आणि रविवार राज मातोश्रीवरच असायचा”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली आहे. अशी परिस्थिती मी आधी कधीही पाहिली नाही. मला या सगळ्या गोष्टींचा वीट येऊ लागला आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. ते लोकमान्य सेवा संघ पार्लेच्या शतकपूर्ती निमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

यावेळी मुलाखतकाराने तुमच्यातला व्यंगचित्रकार सदैव जागा असेल तर तो तुमच्यातल्या राजकीय नेत्यावर कुरघोडी करतो का? असा सवाल विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “नाही, तशी वेळ येत नाही. मी तशी वेळ येऊ देत नाही. खरं सांगायचं झालं तर,मागे मी एकदा माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की, मी अपघाताने राजकारणात आलो आहे. माझ्या घरात राजकीय वातावरण होतं. त्यातून मी राजकीय व्यंगचित्रकार झालो. त्या सगळ्या वातावरणात मी वाढलो.”

हेही वाचा- “संजय राऊत हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला…”, ‘या’ प्राण्याशी तुलना करत संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया!

“पण आताचं महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर मी या राजकारणात योग्य नाही, असं मला वाटतं. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ आहे. आतापर्यंत मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही. याला सोशल मीडिया कारणीभूत आहे, असं मला वाटतं. कारण कुणीही व्यक्त व्हायला लागलंय. त्यांच्या व्यक्त होण्याला पैसे लावले पाहिजे, तरच ते गप्प होतील. कुणी काहीही बोलतंय. हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय. मी यावर अनेकदा बोललो आहे,” असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

हेही वाचा- “आता बोलायची वेळ आलीय, कारण…”; बीडमध्ये पंकजा मुंडेंचं थेट विधान, नेमका रोख कुणाकडे?

“मला आता या सगळ्या गोष्टींचा वीट यायला लागला आहे. येथे अनेक लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं आहे, पण असा महाराष्ट्र कधी कुणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 20:16 IST
Next Story
राज्यातील ५५.३२ टक्के शिक्षकांना पहिल्या पसंतीची बदली; शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण
Exit mobile version